शाळेतच मिळणार मोफत बसपास
By admin | Published: April 13, 2016 01:58 AM2016-04-13T01:58:55+5:302016-04-13T01:58:55+5:30
राज्यातील विद्यार्थ्यांना एसटीचे मोफत पास त्यांच्या शाळेतच उपलब्ध केले जातील, अशी घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत केली. राज्यातील जनतेला जलद व घरबसल्या
मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना एसटीचे मोफत पास त्यांच्या शाळेतच उपलब्ध केले जातील, अशी घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत केली. राज्यातील जनतेला जलद व घरबसल्या सेवा देण्यावर सरकारने भर दिला असून, सर्व आरटीओ कार्यालये महिनाभरात भ्रष्टाचारमुक्त केली जातील, तसेच महिलांना रिक्षा खरेदीसाठी २५ टक्के अनुदान देण्यात येणार असल्याचे रावते यांनी सांगितले.
परिवह विभागासंदर्भात झालेल्या चर्चेला उत्तर देताना रावते म्हणाले की, ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीनिमित्त रिक्षा परवाने वाटपात ५२ टक्के सामाजिक आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामध्ये गिरणी कामगारांची मुले, गोवा मुक्तिसंग्राम व सीमा लढ्यातील हुतात्म्यांच्या वारसांचाही समावेश आहे. महिलांसाठी शेअर टॅक्सीमध्ये चालकाच्या शेजारची पहिली सीट राखीव ठेवण्यात आली आहे. ८० टक्के रिक्षापरवाने मराठी तरुणांनाच दिले जातील, असे रावतेंनी ठणकावले.