राज्यात दूधवाढीसाठी मुक्तसंचार गोठा पद्धत
By admin | Published: February 15, 2017 03:15 AM2017-02-15T03:15:41+5:302017-02-15T03:15:41+5:30
मराठवाड्यात दूध उत्पादन वाढीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरल्यानंतर मुक्तसंचार गोठा पद्धतीचा अवलंब संपूर्ण राज्यात करण्याचा निर्णय
मिलिंद कीर्ती / चंद्रपूर
मराठवाड्यात दूध उत्पादन वाढीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरल्यानंतर मुक्तसंचार गोठा पद्धतीचा अवलंब संपूर्ण राज्यात करण्याचा निर्णय राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने घेतला आहे. जर्सीऐवजी देशी गार्इं पालनासाठी विशेष प्रोत्साहन दिले जाणार असून त्याबाबत प्रत्येक जिल्ह्यात कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत.
पशुसंवर्धन विभागाने यासाठी महाराष्ट्र राज्य विस्तार प्रशिक्षक म्हणून डॉ. शैलेश मदन यांची नियुक्ती केली आहे. अमेरिकेच्या संस्थेत प्रशिक्षण घेऊन भारतात परत आल्यावर त्यांनी लातूर परिसरात दूध उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. डॉ. मदन यांनी राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये जानेवारीपासून हा कार्यक्रम आखला आहे.