राज्यातील १0५ अंध शाळांना मिळणार मोफत शैक्षणिक पाठय़पुस्तके
By Admin | Published: January 5, 2015 11:59 PM2015-01-05T23:59:27+5:302015-01-05T23:59:27+5:30
केंद्राने केलेल्या अर्थसहाय्यातून ‘नॅब’ पुरविणार ब्रेल साहित्य.
राम देशपांडे /अकोला : अंधांच्या जीवनात ज्ञानरुपी प्रकाशज्योती निर्माण करण्याचं कार्य करणार्या 'नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड' (नॅब) या संस्थेने राज्यातील १0५ अंध शाळांना मोफत शैक्षणिक पाठय़पुस्तके देण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रेल भाषेतील साहित्य तयार करणे महागात पडत असले तरी, इंग्रजी आणि मराठी माध्यमातील पहिली ते बारावीपर्यंतच्या क्रमिक पाठय़पुस्तकांवर ह्यनॅबह्णच्यावतीने ७५ टक्के सूट दिली जाते. गेल्या ६५ वर्षांपासून केवळ दोन यंत्रांच्या सहाय्याने ब्रेल पाठय़पुस्तके तयार करणार्या ह्यनॅबह्ण ला वाढत्या छपाई मुल्यामुळे पाठय़पुस्तकांचा दर्जा सांभाळणे देखील कठीण झाले होते. अशा स्थितीत केंद्र शासनाने डेहरादूनच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हिज्युअल हॅण्डीकॅप या संस्थेच्या माध्यमातून नॅबला पावणेदोन कोटी रूपयांचे अर्थसहाय्य देण्याचे ठरविले आहे. या अनुदानातून राज्यातील १0५ अंध शाळांना मोफत शैक्षणिक पाठय़पुस्तके पुरविणे शक्य होणार आहे. केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागामार्फत देशात ब्रेल प्रेस निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. त्या अनुषंगाने ह्यनॅबह्णने डेहरादून येथील अंधांसाठी कार्य करणार्या देशातील प्रमुख संस्थेकडे नवीन प्रकल्प सादर केला होता. केंद्र शासनाची त्यास परवानगी मिळाली आहे. या संस्थेमार्फत केंद्र शासनाकडू दोन कोटी अर्थसहाय्य मिळण्याची शक्यता आहे. या निधीतून ब्रेल साहित्य तयार करण्यासाठी अत्याधुनिक यंत्र सामग्री खरेदी केली जाईल. या माध्यमातून तयार केली जाणारी नवी पाठय़पुस्तके राज्यातील १0५ अंध शाळांना फोफत पुरविण्याचा ह्यनॅबह्णचा विचार असल्याचे नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंडचे महेंद्र मोरे यांनी सांगीतले.