औरंगाबादेत रविवारी मोफत हात-पाय वाटप शिबिर
By admin | Published: April 10, 2015 04:01 AM2015-04-10T04:01:37+5:302015-04-10T04:01:37+5:30
‘लोकमत समाचार’ आणि ‘साधू वासवानी ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ‘लोकमत हेल्पलाईन’ व ‘लायन्स क्लब रॉयल’ यांच्या सहकार्याने १२ एप्रिल रोजी
औरंगाबाद : ‘लोकमत समाचार’ आणि ‘साधू वासवानी ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ‘लोकमत हेल्पलाईन’ व ‘लायन्स क्लब रॉयल’ यांच्या सहकार्याने १२ एप्रिल रोजी औरंगाबादेत मोफत कृत्रिम हात-पाय (जयपूर फूट) वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
शहरातील जालना रोडवरील लोकमत भवनच्या रिगल लॉनवर रविवारी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत हे शिबिर होणार आहे़ तज्ज्ञांकडून संबंधितांची तपासणी करून त्यानंतर त्यांना मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. तपासणी आणि परीक्षणानंतरच त्यांना कृत्रिम अवयवाचे वाटप केले जाणार आहे. शिबिरात पोलिओग्रस्त व्यक्तींचा विचार केला जाणार नसल्याचे आयोजकांनी म्हटले आहे़ अपघातात अवयव गमावलेले, मधुमेहग्रस्त व्यक्ती, रक्तवाहिन्यांमधील विकाराने पीडित व्यक्ती आणि गँगरीनने पीडित व्यक्ती सामान्य जीवन जगण्यास असमर्थ ठरतात, अशा व्यक्ती कृत्रिम अवयवाच्या साह्याने सामान्य व्यक्तींसारखे जीवन जगू शकतात. या शिबिराचा जास्तीतजास्त गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन लायन्स क्लब रॉयलचे पारस ओस्तवाल, मनोज बोरा, लोकमत हेल्पलाइनचे संयोजक विंग कमांडर (सेवानिवृत्त) टी.आर. जाधव यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी ९५५२५६४५६० या क्रमांकावर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)