राज्यात सात दिवस मिळणार फुकट दूध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:53 AM2018-04-27T00:53:17+5:302018-04-27T00:53:17+5:30

अतिरिक्त दूध गायींच्या गोठ्यात नव्हे तर, दूध संघात तयार होते़ शेतकऱ्यांकडून संकलन केलेल्या एका टँकरच्या दुधावर प्रक्रिया करून तीन टँकर दूध कृत्रिमरित्या तयार केले जाते.

Free milk for seven days in the state! | राज्यात सात दिवस मिळणार फुकट दूध!

राज्यात सात दिवस मिळणार फुकट दूध!

googlenewsNext

अहमदनगर : सरकारी दूधधोरणाविरोधात शेतकरी संघर्ष समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे़ महाराष्ट्रदिनानंतर ३ मेपासून राज्यात फुकट दूध वाटपाचे अनोखे आंदोलन हाती घेण्याचा निर्णय नगर येथील बैठकीत झाला. याची माहिती शेतकरी सुकाणू समितीचे राज्य समन्वयक अजित नवले यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली़
नवले म्हणाले, अतिरिक्त दूध गायींच्या गोठ्यात नव्हे तर, दूध संघात तयार होते़ शेतकऱ्यांकडून संकलन केलेल्या एका टँकरच्या दुधावर प्रक्रिया करून तीन टँकर दूध कृत्रिमरित्या तयार केले जाते. त्याचा परिणाम दरावर झाला आहे़ सरकारने दुधाला २७ रुपये भाव जाहीर केला़ प्रत्यक्षात मात्र १५ ते २० रुपये भाव मिळतो़ कृत्रिम रसायनयुक्त दुधामुळे सामान्यांचे आरोग्य धोक्यात आहे़ कृत्रिम दूध तयार करणाºया संघांवर कुणाचेच नियंत्रण राहिलेले नाही़ एकीकडे शेतकºयांची लूट सुरू आहे, तर दुसरीकडे ग्राहकांना विषारी दूध मिळते आहे़ त्याला सरकारचे धोरणच जबाबदार आहे़ त्यामुळे शेतकरी संघटनांनी सरकारविरोधात आंदोलनाची हाक दिली असून, राज्यातील अहमदनगरसह औरंगाबाद, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक जिल्ह्यात आंदोलन करण्यात येणार आहे.
शेतकरी संपाला जूनमध्ये एक वर्ष पूर्ण होत आहेत़ या पार्श्वभूमीवर दूध दरवाढीसाठी लढा उभारण्याचा निर्णय समितीने घेतला आहे़ औरंगाबाद जिल्ह्यातील लाखगंगा ग्रामपंचायतीने ३ ते ९ मे, या काळात गाव, गल्ली, तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फुकट दूध वाटपाचा ठराव केला आहे़ या धर्तीवर महाराष्ट्रदिनी राज्यभरातील इतर ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेत आंदोलनाचा ठराव केला जाईल़ त्यानंतरही सरकारने दखल घेतली नाही तर जूनमध्ये राज्यातील सर्व संघटना एकत्र येऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवतील़ शेतकºयांना रस्त्यावर उतरु द्यायचे किंवा नाही, ते सरकारनेच ठरावावे, असा इशारा नवले यांनी या वेळी दिला़

दूध संघाकडून फॅटची चोरी
शेतकºयांकडून ३़५ फॅटचे दूध घेतले जाते़ प्रत्यक्षात ग्राहकांना मात्र १़५ फॅटचे दूध मिळते़ दूध संघ फॅट चोरतात़ त्याचा लाभ दूध संघ उठवितात़ शेतकºयांना मात्र जास्त फॅटचे दूध देऊनही कमी दर मिळतो़

Web Title: Free milk for seven days in the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :milkदूध