दक्षिण मुंबईत मोफत पार्किंग
By Admin | Published: August 23, 2016 07:48 PM2016-08-23T19:48:59+5:302016-08-23T20:41:28+5:30
हॉर्निमन सर्कल, एऩ.सी़.पी़.ए़, मरीन ड्राईव्ह, विधान भवन अशा प्रसिद्धी परिसरातील ३९ वाहनतळावर वाहन मोफत उभी करता येणार आहे़.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ : हॉर्निमन सर्कल, एन.सी.पी.ए, मरीन ड्राईव्ह, विधान भवन अशा प्रसिद्धी परिसरातील ३९ वाहनतळावर वाहन मोफत उभी करता येणार आहे़. या वाहनतळांवर ठेकेदार नियुक्त करण्याच्या प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्यामुळे महापालिका प्रशासनाने वाहनतळ मोफत उपलब्ध केले आहे़ दक्षिण मुंबईत ए विभागांतर्गत फोर्ट, कुलाबा, चर्चगेट या परिसरांमध्ये ३९ पार्किंग आहेत़ या वाहनतळांची जबाबदारी ठेकेदारांवर सोपविण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या़ मात्र निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर पालिकेने हे पार्किंग सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे़
त्यानुसार ठेकेदार मिळेपर्यंत अशा ३९ ठिकाणी नागरिकांना विनामूल्य वाहनं उभी करता येणार आहेत़ या जागांवरील पार्किंगसाठी कुणी पैसे घेतल्यास याची तक्रार पालिका अथवा मुंबई पोलिसांकडे करता येणार आहे़ तेथील संपर्क प्रमुखांच्या क्रमांकाचे फलकही या पार्किंगच्या ठिकाणी लावले जाणार आहेत़ ३९ वाहनतळांच्या ठिकाणी चार हजार ९२४ चारचाकी आणि दोन हजार २२२ दुचाकी वाहनं उभी करता येतील़ या ठिकाणी आहे मोफत पार्किंग ठिकाणचार चाकी दुचाकी एऩएस़मार्ग२०२ ९० विधानभवन मार्ग८७ ३९ एनसीपीए मार्ग७१ ३२ जमशेटजी टाटा मार्ग७० ३१ विनयक़े़ शाह,गोयंका मार्ग ९८ ४४ फ्री प्रेस मार्ग१४० ६३ जमनालाल बजाज मार्ग ११७ ५२ हॉर्निमन सर्कल,होमजी स्ट्रीट ४४११९७ एस़ए़बेलवी मार्ग७० ३१ मुंबई समाचार मार्ग१२३ ५५