महामार्ग रुंदीकरणाचा मार्ग मोकळा
By Admin | Published: August 3, 2016 05:18 AM2016-08-03T05:18:45+5:302016-08-03T05:18:45+5:30
आळेफाटा येथील बायपासच्या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिक उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर, मंचर, कळंब, नारायणगाव आणि आळेफाटा येथील बायपासच्या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिक उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यामुळे पुणे-नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणाचा प्रश्न निकाली निघाला आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे-नाशिक अंतर केवळ तीन तासात पूर्ण करणे शक्य होणार आहे.
पुणे-नाशिक महामार्गाच्या चार पदरीकरणाचा विषय विविध कारणांमुळे रेंगाळत आहे. पुणे जिल्ह्यात राजगुरुनगर ते आळेफाटा असा ५५ किलोमिटरचा रस्ता चार पदरी करण्यात येणार आहे. यासाठी २५३ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. भविष्यात वाढणारी वाहतूक विचारात घेऊन राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर, मंचर, कळंब, नारायणगाव आणि आळेफाटा येथे बायपास प्रस्तावित केले आहेत. यामुळे पुणे जिल्ह्यातील एक हजार पेक्षा अधिक शेतकरी बांधित होत आहेत. जमिनीला आलेले प्रचंड भाव व मोठ्या प्रमाणात सुपिक जमिनी संपादनात जात असल्याने शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला. यासाठी या पाच गावांतील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बायपासच्या विरोधात याचिक दाखल केली. शेतकऱ्यांचे म्हणने ऐकूण घेण्यासाठी न्यायालयाने बायपास करण्यासाठी स्थगिती दिली होती.
शेतकऱ्यांनी याचिका दाखल करताना बायपासची गरज नसताना बायपास करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात सुपिक व बागायत जमिन संपादित होत असून, अनेक शेतकरी भूमिहीन होत आहेत. काही धनदांडग्या लोकांच्या जमिनी वाचविण्यासाठी बायपास प्रस्तावित केल्याचा आरोप केला होता. (प्रतिनिधी)
>अपिलसाठी स्थगिती...
शेतकरी आणि भूसंपादन अधिकारी, एनएचएआय याची बाजू ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने याचिक फेटाळली. अपिल करण्यासाठी स्थगिती देता येणार नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांचे म्हणने ऐकूण घेण्यासाठी बायपासला स्थगिती