श्रमदानाला येणाऱ्यांची मोफत दाढी-कटिंग! लातूरमधील नाभिकाचा अभिनव उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 02:01 AM2018-04-21T02:01:50+5:302018-04-21T02:01:50+5:30
जलसंवर्धनाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी तालुक्यात श्रमदानाची चळवळ गतिमान झाली आहे. त्याला आणखी चालना मिळावी म्हणून गुरधाळ येथील एका नाभिकाने श्रमदात्यांसाठी चक्क शेतीच्या बांधावर मोफत दाढी-कटिंग सुरू केले आहे.
देवणी (जि. लातूर) : जलसंवर्धनाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी तालुक्यात श्रमदानाची चळवळ गतिमान झाली आहे. त्याला आणखी चालना मिळावी म्हणून गुरधाळ येथील एका नाभिकाने श्रमदात्यांसाठी चक्क शेतीच्या बांधावर मोफत दाढी-कटिंग सुरू केले आहे. गुरधाळ गावाने पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यामुळे गावात श्रमदानाचे काम सुरूआहे. मात्र, गावातील काही शेतकरी दाढी- कटींग करण्यासाठी गावात थांबत असल्याचे नाभिक कारागीर गोपाळ गुरधाळकर यांनी पाहिले़ या शेतकºयांचा वेळ वाया जावू नये आणि श्रमदानात सहभाग वाढावा म्हणून त्यांनी बांधावरच दाढी-कटींग सुरू केले आहे.
आमीरने दिली टाळ्या वाजवून दाद
बॉलिवुड स्टार अमीर खानने सुरू केलेला पाणी फाउंडेशनचा उपक्रम शेतकºयांसाठी विशेष लाभदायी आहे. अमीर खानने येथे येऊन श्रमदान करावे आणि मला त्याची सेवा करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा गोपाळ गुरधाळकर यांनी सोशल मीडियावरून अमीर खानकडे व्यक्त केली होती. यावर आमीरने टाळ्या वाजवून प्रतिसाद दिल्याची क्लिप व्हायरल झाली आहे.
बारा बलुतेदारांपैकी मी एक आहे़ सर्वांची उपजीविका शेतक-यांवर अवलंबून आहे. शेतक-यांकडे पिकले, तरच आपल्याला मिळणार. शेत बहरावे यासाठी श्रमदानातून पाणी मुरविणे गरजेचे आहे. त्यासाठीच माझा हा प्रयत्न आहे.
- गोपाळ गुरधाळकर
महाराष्ट्रदिनी महाश्रमदान - आमिर खान
पुणे : महाराष्ट्रात सुरू असलेल्या ‘पानी फाउंडेशन’ संस्थेच्या पाणलोट क्षेत्रातील कामाला वेग आला आहे. महाराष्ट्रदिनी चार हजार गावांमध्ये शहरवासीयांना कामाची संधी उपलब्ध करून दिली असल्याची माहिती ‘पानी फाउंडेशन’चे संस्थापक अभिनेते आमिर खान यांनी दिली. खान यांनी पत्रकार परिषदेत महाश्रमदानामागची संकल्पना विशद केली.
ते म्हणाले, यंदा महाराष्ट्रातल्या २४ जिल्ह्यांतील ७५ तालुक्यांतील चार हजारहून अधिक गावे वॉटरकप स्पर्धेसाठी सहभागी झाली आहेत. दुष्काळग्रस्त भागातील गावांत अधिक जोमाने काम सुरू आहे. महाश्रमदानामध्ये सहभागी होऊ इच्छिणाºयांनी जलमित्र पानी फाउंडेशनच्या वेबसाइटवर जवळच्या गावासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.
प्रत्येकाला तीन तासांचे काम देण्यात येणार आहे. त्यामुळे या कामात प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तींनी सहभागी व्हावे. ग्रामीण भागातले काम पूर्ण झाल्यावर शहरी भागातही पाणी फाउंडेशन भविष्यात काम करणार आहे. असे झाल्यास पुढील पाच वर्षांत ‘पानी फाऊंडेशन’ची गरज भासणार नाही.