ठाणे ग्रामीणसाठी स्वतंत्र ध्वनिप्रदूषण नियंत्रण पथक
By admin | Published: June 4, 2016 03:12 AM2016-06-04T03:12:08+5:302016-06-04T03:12:08+5:30
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ध्वनिप्रदूषणाच्या तक्र ारी सोडवण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांनी स्वतंत्र ध्वनिप्रदूषण नियंत्रण पथकाची स्थापना केली
ठाणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ध्वनिप्रदूषणाच्या तक्र ारी सोडवण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांनी स्वतंत्र ध्वनिप्रदूषण नियंत्रण पथकाची स्थापना केली. हे पथक जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांत आणि नियंत्रण कक्षांत कार्यरत असेल. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाबाबत यापुढे तेथे तक्रार करता येईल, असा तपशील ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी दिला.
ध्वनिप्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार
६५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज करणे गुन्हा आहे. ध्वनिप्रदूषणाच्या त्रासाला आळा घालण्यासाठी तसेच त्याबाबत तक्रार करण्यासाठी शहर पोलिसांपाठोपाठ ठाणे ग्रामीण पोलिसांनी स्वतंत्र पथकाची स्थापना केली आहे. हे पथक ठाणे ग्रामीण पोलिसांच्या सर्व ठाण्यांमध्ये कार्यरत राहणार असून, ध्वनिप्रदूषण प्राधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)इथे साधा संपर्क
१०० या दूरध्वनी क्र मांकावर याबाबतची तक्र ार करता येणार आहे. त्याचबरोबर ध्वनिप्रदूषण नियंत्रण पथकातील सर्व अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक ठाणे ग्रामीण पोलिसांच्या ६६६.३ँंल्ली१४१ं’स्रङ्म’्रू.ङ्म१ॅ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. जर, याबाबतच्या तक्रारींची दखल घेतली गेली नाही, तर अपर पोलीस अधीक्षक प्रशांत कदम यांच्याशी ०२२-२५३४३१५० संपर्क साधण्याचे अथवा त्यांच्या ६६६.ंिि’२स्र.३१@ॅें्र’.ूङ्मे या मेलवर तक्रारी करता येतील.
आणखी १० ध्वनिमापक यंत्रांची गरज
सद्य:स्थितीत ग्रामीण पोलिसांकडे १० ध्वनिमापक यंत्रे आहेत. मात्र, ज्या पद्धतीने नवी यंत्रणा विकसित करण्यात आली आहे, ती पाहता अजून तितक्याच यंत्रांची गरज आहे. अशी यंत्रे विकत घेण्यासाठी ठाणे जिल्हा नियोजन समितीकडे (डीपीडीसी) प्रस्ताव सादर केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.