इजिप्तमधील इमानवर होणार मोफत शस्त्रक्रिया

By Admin | Published: January 15, 2017 02:25 AM2017-01-15T02:25:33+5:302017-01-15T02:25:33+5:30

इजिप्तमधल्या अलेक्झॅन्ड्रियामधील इमान अहमद अब्लदुलाती या ५०० किलो वजन असलेल्या ३६ वर्षीय महिलेवर प्रख्यात बेरिएट्रीक सर्जन डॉ. मुफ्फझल लकडावाला मोफत

Free surgery in Egypt will be believed | इजिप्तमधील इमानवर होणार मोफत शस्त्रक्रिया

इजिप्तमधील इमानवर होणार मोफत शस्त्रक्रिया

googlenewsNext

मुंबई : इजिप्तमधल्या अलेक्झॅन्ड्रियामधील इमान अहमद अब्लदुलाती या ५०० किलो वजन असलेल्या ३६ वर्षीय महिलेवर प्रख्यात बेरिएट्रीक सर्जन डॉ. मुफ्फझल लकडावाला मोफत शस्त्रक्रिया करणार आहेत. शस्त्रक्रियेनंतर जवळपास सहा महिने इमानला भारतात डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहावे लागणार आहे. डॉ. मुफ्फझल लकडावाला यांच्या प्रयत्नानंतर चर्नी रोड येथील सैफी रुग्णालयाच्या आवारात ८०० चौरस फूट जागेत विशेष ‘वन बेड हॉस्पिटल’ उभारण्यात येत आहे.
या ‘वन बेड हॉस्पिटल’साठी तब्बल दोन कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या विशेष रुग्णालयाचा दरवाजा सात फुटांचा असणार आहे, शिवाय बेडसुद्धा इमानच्या वजनाच्या अनुसार उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच, या हॉस्पिटलमध्ये एक आॅपरेशन थिएटर, एक अतिदक्षता विभाग, डॉक्टरांसाठी एक रूम, दोन विश्रामगृहे, देखभाल करणाऱ्या डॉक्टरांचा कक्ष आणि एक व्हिडीओ कॉन्फरन्स्ािंग रूम अशी रचना असणार आहे. डॉ. लकडावाला यांच्या नेतृत्वाखाली इमानवरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी जगभरातील वैद्यकीय शाखांतील तज्ज्ञांचा समावेश असणार आहे. त्यात हृदयविकारतज्ज्ञ, श्वसनविकारतज्ज्ञ, आहार-पोषणतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, इंटेन्सिव्हिस्टस आणि एन्डोक्रिनोलॉजिस्ट यांचा समावेश असेल.
इजिप्तहून इमानला भारतात येण्याचा आणि शस्त्रक्रियेनंतरच्या उपचारांसाठीच्या निधीसाठी डॉ. लकडावाला यांनी ‘सेव्ह इमान कॉझ’ ही आॅनलाइन चळवळ सुरू केली आहे. इमानच्या केसस्टडीच्या अभ्यासानंतर तिच्यावरील शस्त्रक्रियेची प्राथमिक तयारी सुरू झाली आहे. इमानला भारतात आणण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. लकडावाला यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

पंचविशीपासून घरातच...
- इमानचे वजन ५०० किलो असल्याने ती जगातील सर्वाधिक वजन असलेली महिला आहे. केवळ ३६ वर्षांची असलेल्या इमानला प्रचंड वजनामुळे घराबाहेर पडता आलेले नाही. वयाच्या पंचविशीपासून ती घरातच आहे.
तिला साधे अंथरुणावरून हलताही येत नाही. अवाढव्य आकारामुळे दैनंदिन हालचाली करणेही तिला कठीण होते. इमान दैनंदिन व्यवहारासाठी पूर्णपणे आईसह बहिणीवर अवलंबून राहते. जन्मावेळी तिचे वजन ५
किलो होते.

Web Title: Free surgery in Egypt will be believed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.