दुर्धर आजार असणा-यांवर मुंबईत मोफत उपचार - पालकमंत्री मदन येरावार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 09:53 PM2017-10-12T21:53:58+5:302017-10-12T21:54:26+5:30

जिल्ह्यातील ज्या रुग्णांना कर्करोग, हृदयरोग आदी दुर्धर आजार आहेत व आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेता येत नाही, अशा निकषात बसणा-या रुग्णांवर आता मुंबईत मोफत उपचार करण्यात येणार आहे

Free treatment in Mumbai on those who are suffering from ill health - Guardian Minister Madan Yerawar | दुर्धर आजार असणा-यांवर मुंबईत मोफत उपचार - पालकमंत्री मदन येरावार

दुर्धर आजार असणा-यांवर मुंबईत मोफत उपचार - पालकमंत्री मदन येरावार

Next

यवतमाळ : जिल्ह्यातील ज्या रुग्णांना कर्करोग, हृदयरोग आदी दुर्धर आजार आहेत व आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेता येत नाही, अशा निकषात बसणा-या रुग्णांवर आता मुंबईत मोफत उपचार करण्यात येणार आहे. या रुग्णांना ने-आण करणे तसेच त्यांची मुंबईत राहण्याची व्यवस्थासुध्दा शासनातर्फे करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी सांगितले.
तहसील कार्यालयात लाभार्थ्यांना धनादेश व प्रमाणपत्राचे वाटप करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, तहसीलदार सचिन शेजाळ आदी उपस्थित होते. 
समाजातील शेवटच्या घटकातील व्यक्ती, अपंग, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तिंच्या मदतीसाठी शासन नेहमी तत्पर आहे. लाभार्थ्यांना तात्काळ मदत मिळण्यासाठी आपले सरकार आग्रही आहे. कोणत्याही योजनेचा लाभ लाभार्थ्यांना लवकर मिळण्यासाठी प्रशासनाने गांभिर्याने काम करावे. तसेच दुर्धर आजार असणा-या रुग्णांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संपर्क साधावा. जेणेकरून त्यांना उपचारासाठी मुंबईला पाठविण्यात येईल. या संपूर्ण उपचाराचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत्‍ करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत 9 लाभार्थ्यांना प्रत्येकी 20 हजार रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले. यात वीज दुर्घटनेत जखमी झालेले मनोहर नागोसे यांना 4 हजार 300 रुपयांचा, वसंत दुधे यांना उपचारासाठी 12 हजार 700 रुपयांचा आणि कर्करोगग्रस्त विलास दुधे यांना बळीराजा चेतना अभियानातून 10 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. याशिवाय मनोहर चक्रे, अनिता येवले, रेखा गजभिये यांनासुध्दा लाभ देण्यात आला. तसेच श्रावणबाळ आणि संजय गांधी योजनेंतर्गत 48 लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. 
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तहसीलदार सचिन शेजाळ यांनी सांगितले की, गत दोन वर्षात 861 जणांना संजय गांधी योजनेत तर 1199 लाभार्थ्यांना श्रावणबाळ योजनेत लाभ मिळवून देण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार तहसीलदार शेजाळ यांनी मानले. यावेळी अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी उपस्थित होते. 

Web Title: Free treatment in Mumbai on those who are suffering from ill health - Guardian Minister Madan Yerawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :docterडॉक्टर