जखमी गोविंदांवर होणार मोफत उपचार; राज्यातील सर्व शासकीय, पालिका रुग्णालयांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 09:42 AM2022-08-19T09:42:49+5:302022-08-19T09:45:19+5:30

Dahihandi : यासंदर्भात काढण्यात आलेला शासन निर्णय हा स्थायी असून यावर्षीपासून दर वर्षासाठी लागू राहील.

Free treatment of injured Govindas in government hospitals; Notice to all Government, Municipal Hospitals | जखमी गोविंदांवर होणार मोफत उपचार; राज्यातील सर्व शासकीय, पालिका रुग्णालयांना सूचना

जखमी गोविंदांवर होणार मोफत उपचार; राज्यातील सर्व शासकीय, पालिका रुग्णालयांना सूचना

googlenewsNext

मुंबई : आज दहीहंडी असून दहिहंडीवेळी किरकोळ दुखापत झाल्यास गोविंदांवर महापालिका तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार केले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत केली होती. यानुसार राज्यातील सर्व  शासकीय दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये,  महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेचे दवाखाने यांना नि:शुल्क वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात काढण्यात आलेला शासन निर्णय हा स्थायी असून यावर्षीपासून दर वर्षासाठी लागू राहील. दरम्यान, याबाबत शिवसेनेचे नेते सुनील प्रभू यांनी सभागृहात मागणी केली होती. 

यंदा राज्य सरकारने दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी आधीच जाहीर केली आहे. तसेच, गुरुवारी राज्य सरारने दहिहंडीचा क्रीडा प्रकारात समावेश करत गोविंदा पथकांना सुखद धक्का दिला. या खेळात सहभागी खेळाडू अर्थात गोविंदांना शासकीय योजनांचा लाभही मिळणार आहे. गोविंदा उत्सवाचा समावेश क्रीडा प्रकारात करुन प्रो गोविंदा स्पर्धा राबवण्यात येणार आहे. या स्पर्धा राज्य शासनाकडून सुरू झाल्यास स्पर्धकांना बक्षीसाची रक्कम ही शासनाकडून मिळेल. 

याचबरोबर, इतर खेळांप्रमाणे या गोविंदांना देखील शासकीय नोकरीत जो काही शासकीय कोटा आहे, त्याचाही लाभ घेता येईल. याशिवाय, शासनाच्या इतरही सुविधांचाही लाभ गोविंदांना घेता येणार आहे. दुर्दैवाने दहीहंडी दरम्यान गोविंदाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये शासनाच्या वतीने देण्याचा निर्णय घेतला आहे. जबर जखमी झालेल्या गोविंदांना आर्थिक मदत म्हणून साडे सात लाख रुपये तर हात-पाय फ्रॅक्चर झाल्यास (होऊ नये पण दुर्दैवाने झाल्यास) पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. 

जल्लोष उत्साहात होणार गोपाळकाला साजरा
श्रीकृष्णाला बालपणी दही, दूध, लोणी या पदार्थांची आवड होती. कृष्णापासून दह्याचे रक्षण व्हावे, यासाठी यशोदा दह्याची हंडी उंच ठिकाणी किंवा शिक्यावर ठेवत असे पण श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहोचण्यात यशस्वी होत असे. यासाठी त्याचे, मित्र त्याला मदत करत असत. या घटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. दरम्यान, कोरोनानंतरच्या निर्बंधानंतर पहिल्यांदाच होणारा दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा होत आहे.

Web Title: Free treatment of injured Govindas in government hospitals; Notice to all Government, Municipal Hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.