सव्वालाख विद्यार्थ्यांना मोफत गणवेश
By Admin | Published: June 6, 2016 11:55 PM2016-06-06T23:55:14+5:302016-06-06T23:58:18+5:30
बीड : शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंददायी राहणार आहे. पुस्तकांसोबतच विद्यार्थ्यांना दोन गणवेश मोफत दिले जाणार आहेत. जिल्ह्यातील सव्वालाखाहून अधिक विद्यार्थ्यांना हा लाभ होत आहे.
बीड : शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंददायी राहणार आहे. पुस्तकांसोबतच विद्यार्थ्यांना दोन गणवेश मोफत दिले जाणार आहेत. जिल्ह्यातील सव्वालाखाहून अधिक विद्यार्थ्यांना हा लाभ होत आहे.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. गट शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत मुख्याध्यापकांना पुस्तकांचे वाटप सुरू आहे. पाठोपाठ गणवेशाचा निधी देखील आला आहे. गणवेश खरेदीचे अधिकार शालेय शिक्षण समिती व मुख्याध्यापकांना दिले असून, विद्यार्थी संख्येनुसार या दोघांच्या संयुक्त खात्यावर निधी जमा केला जाणार आहे.
शनिवारी जिल्हा परिषदेला गणवेशापोटी ५ कोटी २६ लाख २६ हजार ८०० रुपये एवढा निधी प्राप्त झाला आहे. हा निधी लवकरच मुख्याध्यापक व शिक्षण समितीच्या खात्यावर वर्ग केला जाईल.
शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेशाचे वाटप करून विद्यार्थ्यांना शाळेबद्दल आवड निर्माण करावी, असे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यानुसार सर्व मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. गणवेश वाटपाचा अहवालही मागविण्यात येईल. एकही पात्र विद्यार्थी यापासून वंचित राहू नये याची काळजी घ्यावी, असे आवाहन सर्व शिक्षा अभियानचे उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड यांनी केले आहे.
तालुकानिहाय गणवेशपात्र विद्यार्थी
अंबाजोगाई : ११ हजार ५३०, आष्टी : १४ हजार ६७३, बीड : २० हजार ४७७, धारूर : ७ हजार ७७०, गेवराी : २२ हजार ८२६, केज : ११ हजार ५६६, माजलगाव : १३ हजार ५, परळी : ११ हजार १०३, पाटोदा : ६ हजार ७१८, शिरूर : ६ हजार ६२८, वडवणी : ५ हजार २६०. (प्रतिनिधी)