कोकण रेल्वेच्या २८ स्थानकांवर मोफत वाय-फाय सुविधा
By Admin | Published: May 17, 2017 12:41 AM2017-05-17T00:41:25+5:302017-05-17T00:41:25+5:30
डिजीटल इंडिया हे स्वप्न साकार करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने बहुतांशी स्थानकावर मोफत वाय-फाय सेवा पुरवण्यास सुरुवात केली आहे. त्याच धर्तीवर कोकण रेल्वेच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : डिजीटल इंडिया हे स्वप्न साकार करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने बहुतांशी स्थानकावर मोफत वाय-फाय सेवा पुरवण्यास सुरुवात केली आहे. त्याच धर्तीवर कोकण रेल्वेच्या २८ रेल्वे स्थानकांवर ही सेवा देण्यात येणार आहे. २ एमबीपीएस या स्पीडने कोकण रेल्वेच्या प्रवाशांना वाय-फाय सेवेचा आनंद घेता येणार आहे.
कोकण रेल्वे विभागातील कोलाड ते मडुरे या स्थानकांदरम्यान २४ तास मोफ त वाय-फाय सुविधा देण्यात येणार आहे. प्रवाशांना मोबाईलच्या माध्यमातून नाव आणि मोबाईल क्रमांक नोंदणी केल्यानंतर ओटीपी (वन टाईम पासवर्ड) द्वारे वाय-फाय सेवेचा आनंद घेता येणार आहे. मोठ्या स्थानकांत ३०० तर लहान स्थानकांत १०० प्रवाशांना या सेवेचा फायदा होणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू लवकरच मोफत वाय-फाय सेवेचे उद्घाटन करणार आहे.