राज्याच्या ग्रामीण भागात मोफत ‘वाय-फाय’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 05:37 AM2018-05-07T05:37:36+5:302018-05-07T05:37:36+5:30
राज्याच्या ग्रामीण भागासह गोव्यात मोफत इंटरनेट वाय-फाय सुविधेचा विस्तार सध्या वेगाने सुरु झाला आहे. ‘जॉयस्टर’ही ब्रॉडबॅन्ड कंपनी ही सेवा मोफत उपलब्ध करुन देत आहे.
मुंबई - राज्याच्या ग्रामीण भागासह गोव्यात मोफत इंटरनेट वाय-फाय सुविधेचा विस्तार सध्या वेगाने सुरु झाला आहे. ‘जॉयस्टर’ही ब्रॉडबॅन्ड कंपनी ही सेवा मोफत उपलब्ध करुन देत आहे. सध्या मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबईसारख्या जिल्ह्यांतील मुख्य सार्वजनिक ठिकाणांवर २४ तास मोफत वाय-फाय सेवा दिली जात आहे.
मोठ्या शहरातच नव्हे, तर कोकण रेल्वेची सर्व स्थानके, पोलिस आयुक्तालय आणि मुख्यालयांवर ही सेवा अविरत सुरू आहे. कंपनीने प्रदान केलेल्या वाय-फाय हॉटस्पॉटद्वारे नियमित सेवा उपभोगणारे सध्या २३ लाख नोंदणीकृत ग्राहक आहेत.
आता जॉयस्टरचे हॉटस्पॉट हे कोलाड, माणगाव, दिवाणखावटी, खेड, चिपळूण, कमाठे, रत्नागिरी, राजापूर, नांदगाव आणि सावंतवाडी रेल्वे स्थानक परिसरासह गोव्यापर्यंत विस्तारण्यात आल्याचे कंपनीचे अध्यक्ष निकुंज कम्पानी यांनी सांगितले. येत्या काही महिन्यांत राज्याच्या ग्रामीण अंतभार्गात विस्ताराची योजना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.