निबंधातून स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली
By admin | Published: August 27, 2016 01:56 AM2016-08-27T01:56:58+5:302016-08-27T01:56:58+5:30
मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे ९ ते २३ आॅगस्ट या कालावधीत महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले
मुंबई : भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा ७0 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे ९ ते २३ आॅगस्ट या कालावधीत महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. याचाच भाग म्हणून विरारच्या विवा महाविद्यालयाच्या महिला सक्षमीकरण कक्षातर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘विस्मृतीत गेलेले स्वातंत्र्यसैनिक’ या विषयावर आयोजित निबंधस्पर्धेत महाविद्यालयातील एकंदर १२६ विद्यार्थी सहभागी झाले होते.
२३ आॅगस्ट रोजी महाविद्यालयाच्या वाचनालयात सकाळी ही स्पर्धा सुरू झाली.
मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा
तीन भाषांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात नेत्यांबरोबरच ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचाही मोठा सहभाग होता. मात्र काळाच्या ओघात त्यांचे हे योगदान विस्मृतीत गेले.
आजच्या विद्यार्थी वर्गाला याचे ज्ञान व्हावे याच उद्देशाने या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
अनेक अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांबाबतही विद्यार्थ्यांनी माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण निबंध या स्पर्धेत लिहिल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)