स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे

By Admin | Published: March 1, 2017 01:28 AM2017-03-01T01:28:04+5:302017-03-01T01:28:04+5:30

जगात वाईट प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात बोकाळल्या असून, त्याचा सामना मुलींनी स्वत: करायला शिकले पाहिजे

Freedom is not a diabolism | स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे

स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे

googlenewsNext


धनकवडी : जगात वाईट प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात बोकाळल्या असून, त्याचा सामना मुलींनी स्वत: करायला शिकले पाहिजे, असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच सुसंस्कृत
व्हावे. विद्यार्थ्यांना मिळणारे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, असेही ते म्हणाले.
भारती विद्यापीठ महिला अभियांत्रिकी महाविद्यालयातील वॉईस्टार स्मरणिकेचे प्रकाशन मंगळवारी झाले. त्या प्रसंगी ते
बोलत होते. प्राचार्य एच. व्ही. वनकुद्रे, यशोमती धुमाळ, प्रणाली यावले, तसेच या स्मरणिकेच्या संपादिका शशांकी सिंंग
उपस्थित होते.निकम म्हणाले, सोशल मीडिया, वृत्तवाहिन्या टीआरपीच्या नादात काय दाखवतात? सध्या चित्रपटातून दाखवल्या जाणाऱ्या दृष्यातून एखाद्याचे डोके भडकू शकते. त्याचे वाईट परिणामही पाहायला मिळतात. सुरुवातीस निकम यांनी ‘तुम्हा पाहुनी मला आठवे तारुण्याचे दिवस आगळे’ ही कविता सादर केली.
(प्रतिनिधी)
>तरुणांनी सोशल मीडिया काळजीपूर्वक वापरावा
पुणे : आज देशाला सुशिक्षित व तत्त्वनिष्ठ युवा पिढीची गरज आहे. सोशल मीडियावर वाहवत जाणारे युवक व युवती आलेल्या संदेशाची शहानिशा न करता फॉरवर्ड करतात. यातून नकळतच चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन दिले जाते. सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करावा, असे आवाहन अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.नऱ्हे येथील झील एजुकेशन सोसायटीमध्ये अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचे ‘युथ अ‍ॅन्ड सोशल मीडिया इथिक्स’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात
आले होते. त्या वेळी ते
बोलत होते.सुरुवातीस निकम यांचा सत्कार संभाजी काटकर यांच्या हस्ते करण्यात आला. प्रा. जयेश काटकर उपस्थित होते. निकम यांच्या हस्ते झील कॉलेज आॅफ इंजिनीरिंग अँड रिसर्चच्या ’उमंग द झील’ या मासिकाचे अनावरण करण्यात आले.

Web Title: Freedom is not a diabolism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.