पदाधिकाऱ्यांना हवेत फुकटचे अंगरक्षक

By admin | Published: May 19, 2016 03:52 AM2016-05-19T03:52:03+5:302016-05-19T03:52:03+5:30

ठाणे महापालिकेत प्रोटोकॉल म्हणून पाच पदाधिकारी, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, वैद्यकीय अधिकारी यांना अंगरक्षक दिले जातात.

Freezing bodyguards to the office bearers | पदाधिकाऱ्यांना हवेत फुकटचे अंगरक्षक

पदाधिकाऱ्यांना हवेत फुकटचे अंगरक्षक

Next

नामदेव पाषाणकर,

घोडबंदर- ठाणे महापालिकेत प्रोटोकॉल म्हणून पाच पदाधिकारी, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, वैद्यकीय अधिकारी यांना अंगरक्षक दिले जातात. सध्या ठाणे शहरात सुरु असलेल्या रस्ता रुंदीकरण मोहिमेमुळे तसेच पाणीकपात संकटामुळे अधिकारी वर्गाला अतिरिक्त अंगरक्षक ठेवावे लागले आहेत. मात्र, असेच अंगरक्षक दहा प्रभाग समिती अध्यक्ष व चार विषय समिती सभापतींनाही द्यावेत, अशी मागणी शिवसेनेच्या गटनेत्यांनी प्रशासनाकडे केली असल्याने सुरक्षारक्षक बोर्डाकडून अधिकचे सुरक्षारक्षक नियुक्त करण्याची वेळ पालिकेवर येणार असून त्याचा आर्थिक बोजा ठाणेकरांना सहन करावा लागणार आहे.
हे अंगरक्षक ठाणे महापालिकेच्या आस्थापनावरील आरक्षक म्हणून काम करणारा वर्ग असतो. गेली काही वर्षे त्यांची भरती झालेली नसल्याने आणि सध्या ती प्रक्रि या सुरु असली तरी पालिकेत या आरक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे सुरक्षारक्षक बोर्डाचे ५५० हून अधिक सुरक्षारक्षक प्रशासनाला तैनात करावे लागत आहेत.ते पालिकेच्या मालमत्ता आणि शिक्षण मंडळाची देखरेख करत आहेत.
जोवर आरक्षक भरती होऊन ते कामावर उपस्थित होत नाहीत तोवर हे रक्षक काम करणार आहेत. आवश्यकतेनुसार अधिकचे सुरक्षारक्षक हे बोर्डाकडून मागवावे लागणार आहेत. त्यासाठी पालिकेला लाखो रु पयांचा खर्च करावा लागत आहे.
असे असताना आता प्रभाग समिती अध्यक्ष, विषय समिती सभापतींना अंगरक्षक पुरवण्याची मागणी सत्ताधारी शिवसेनेकडून झालेली आहे. एखाद्या अधिकारी किंवा पदाधिकारी यांच्या जीवाला धोका असेल तर त्यांना अंगरक्षक पुरवणे हे कायद्याचे काम आहे. मात्र एक प्रोटोकॉल म्हणून अंगरक्षक देण्याचे काम पालिकेकडून होत असताना त्याचा गैरफायदा अन्य पदाधिकारी घेण्यास पुढे आल्याचे दिसून येते.
।प्रस्तावाचा प्रवास पीडब्ल्यूडीतच
विशेष म्हणजे पालिकेकडे
अवघे पाच अंगरक्षक हे
बंदुकधारी आहेत. शिवसेना गटनेते संतोष वडवले यांनी ही प्रस्तावाची सूचना केलेली असून ती उपायुक्त मुख्यालय यांच्याकडून सुरक्षा अधिकारी यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर होणे अपेक्षित असताना हा प्रस्ताव पीडब्लूडी विभागाकडे फिरत आहे.
याबबत सुरक्षा अधिकारी सुनील मालवणकर यांना विचारले असता त्यांनी अद्याप हा प्रस्ताव माझ्याकडे आलेला नसून आल्यास पालिका धोरणानुसार योग्य कार्यवाही केली जाईल, असे सांगितले.
महापौर, उपमहापौर,सभागृह नेते, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्ष नेते या पदाधिकाऱ्यांना अंगरक्षक दिले गेले आहेत.

Web Title: Freezing bodyguards to the office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.