मालवणी दारूकांड : हत्येचे आरोपपत्र दाखल

By admin | Published: September 11, 2015 03:28 AM2015-09-11T03:28:22+5:302015-09-11T03:28:22+5:30

मालवणी दारूकांडात विषारी दारू पाजून लोकांना ठार केल्याचा ठपका ठेवत गुन्हे शाखेने गुरुवारी १४ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. हे आरोपपत्र १३ हजार ७६०

Freight charges: file chargesheet | मालवणी दारूकांड : हत्येचे आरोपपत्र दाखल

मालवणी दारूकांड : हत्येचे आरोपपत्र दाखल

Next

मुंबई : मालवणी दारूकांडात विषारी दारू पाजून लोकांना ठार केल्याचा ठपका ठेवत गुन्हे शाखेने गुरुवारी
१४ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. हे आरोपपत्र १३ हजार ७६० पानांचे असून, यात दोन आरोपींना फरार दाखवण्यात आले आहे. सर्व आरोपींवर खुनाचा आरोप ठेवण्यात आला आहे.
विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांच्यामार्फत गुन्हे शाखेने अतिरिक्त महानगर दंडाधिकारी देशमुख यांच्यासमोर हे आरोपपत्र दाखल केले. यावरील पुढील सुनावणी येत्या
१५ सप्टेंबरला होणार आहे. याचा खटला कधी सुरू होईल, याची तारीखही त्या दिवशी न्यायालय जाहीर करण्याची शक्यता आहे.
मालवणी येथे आरोपींनी एकत्रित कट रचून १७ व १८ जुलै २०१५ रोजी नागरिकांना विषारी दारू पाजली. यात १०६ जणांचा बळी गेला; तर ७६ जणांना कायमचे अपंगत्व आले आहे, असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
यातील सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दोन आरोपींनी जामिनासाठी अर्जही केला होता. न्यायालयाने आरोपींना जामीन नाकारला. त्यामुळे पुढील सुनावणीला या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले जाईल. (प्रतिनिधी)

जून महिन्यात मालवणीमध्ये विषारी दारू प्यायल्याने १०६ जणांचा बळी गेला होता तर
७६ जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. या प्रकरणी मालवणी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकासह ८ पोलिसांना, त्याचप्रमाणे उत्पादन शुल्क विभागाच्या ४ अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले होते.

आरोपींची नावे : राजू टापकर, डोन्लाड पटेल, गौतम आरडे, सलीम शेख, फ्रान्सिस डिमेलो, ममता सिया-राठोड, ग्रेसी आॅन्टी, अतिक खान, किशोर पटेल, सिमरन सय्यद, लीलाधर पटेल, सुभाष गिरी, प्रकाश पटेल, २ फरार आरोपी.

आरोपींवरील आरोप : ३०२ - खून, ३०४ - सदोष मनुष्यवध, ३०७ - खुनाचा प्रयत्न, १२० (ब) - कट रचणे, ११४ - गुन्ह्यात सहभाग, २०१- गुन्हा लपवण्यासाठी चुकीची माहिती देणे, ३२६- हानी पोहोचवणे, ३२८- हेतुपुरस्सर विषारी द्रव्य देणे, मुंबई प्रतिबंध कायदा, कलम ६५, विषारी द्रव्य प्रतिबंधक कायदा, कलम ६.

आरोपपत्राचा तपशील
13760
पानी आरोपपत्र
577
साक्षीदार
78
दारूच्या बाटल्या
164
गावठी दारूचे फुगे

साक्षीदारांचे जबाब
सीए अहवाल
एफएसएल अहवाल
प्लॅस्टिकचे कॅन
पाइप
वाहतुकीचा तपशील

विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांच्यामार्फत गुन्हे शाखेने अतिरिक्त महानगर दंडाधिकारी देशमुख यांच्यासमोर हे आरोपपत्र दाखल केले. यावरील पुढील सुनावणी येत्या १५ सप्टेंबरला होणार आहे.

Web Title: Freight charges: file chargesheet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.