फ्रेंच कलाकारांकडून मूकबधिरांना नृत्याचे धडे!

By admin | Published: November 26, 2014 11:13 PM2014-11-26T23:13:20+5:302014-11-27T00:11:05+5:30

समता संस्था : आवाजाशिवाय नृत्याचा आविष्कार

French artists make dance lessons for idiots! | फ्रेंच कलाकारांकडून मूकबधिरांना नृत्याचे धडे!

फ्रेंच कलाकारांकडून मूकबधिरांना नृत्याचे धडे!

Next

सागर गुजर - सातारा --कानावर ध्वनी पडतच नसल्यानं व्यक्त कसं व्हायचं, असा त्यांच्यापुढील जन्मजात प्रश्न! अंगापिंडानं धडधाकट असणाऱ्या मूकबधिर मुलांना हा प्रश्न वर्षानुवर्षे छळत आलाय. फ्रान्सहून साताऱ्यात दाखल झालेले वालिद घेझ आणि अ‍ॅलिस कॉचेट हे दोघे येथील समता मूकबधिर विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये नृत्याच्या कलागुणांची पेरणी करत आहेत.
कुरळ्या केसांचा वालिद घेझ हा तरुण आणि त्याची मैत्रिण उंचपुरी अ‍ॅलिस ड्युपाँट कॉचेट हे फ्रान्समध्ये गेल्या दहा वर्षांपासून सामाजिक काम करत आहेत. मूकबधिर, मतिमंद विद्यार्थ्यांसाठी हे दोघेही झटून काम करत आहेत.
ब्राझीलमध्ये प्रसिध्द असणारा ‘कॅपोरिया’ हा डान्स या दोघांनीही अवगत केला आहे. कॅपोरिया म्हणजे आवाजाशिवाय अथवा ध्वनीशिवाय नाचणे व खेळ खेळणे होय. वर्षापूर्वी हे दोघेही संपूर्ण जगप्रवासाला निघाले. भारतात अपंग विद्यार्थ्यांची स्थिती जाणून घेण्याचे प्रयत्न त्यांनी सुरु केले. मागील आठवड्यापासून त्यांनी समता शिक्षण संस्थेच्या मूकबधिर व मतिमंद विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना त्यांच्या विकासासाठी आवश्यक असणारे खेळ व नृत्याचे प्रशिक्षण सुरु केले आहे.
ध्वनीशिवाय नाचण्याचे तंत्र मूकबधीर व मतिमंद मुलांना अवगत होऊ लागले आहे. मुलेही त्यांना चांगला प्रतिसाद देत आहेत. शिक्षकांच्या सोबतीने ही मुले कॅपोरिया हा आगळा वेगळा नृत्यप्रकार शिकू लागली आहेत. मूकबधीर विद्यालयातील मुले स्नेहसंमेलनात तसेच ग्रंथ महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आपले कौशल्य नेहमी सिध्द करीत असतात. आता या नव्या तंत्राच्या प्रशिक्षणामुळे त्यांना वेगळी दिशा मिळाली आहे. फ्रान्समध्ये विकसित असलेली चित्रकलाही या मुलांना अवगत व्हावी, या हेतूने रोज चित्रकलाही शिकविली जात आहे.


या प्रयोगातून जाईल जडपणा
केवळ ‘अबकड’ हेच केवळ शिक्षण नसून यापेक्षा संगीत, नृत्य या प्रकारातूनही शिक्षण देता येतं, असं फ्रान्सवरुन आलेल्या या पाहुण्यांचं म्हणणे असून हा प्रयोग त्यांनी फ्रान्समध्ये केला आहे.
फ्रान्समध्ये अनेक मतिमंद व मूकबधिर मुले रस्त्यावर येऊन गाणी व नृत्य करत असतात. यातून त्यांच्यातील जडपणा जाऊन अवयव आणि मेंदूला चालना मिळू शकते, असं त्यांचं मत आहे.
कॅपोरिया डान्सचा हा प्रकार कोणत्याही आवाजाविना शिकता येतो. मूकबधीर मुलांना याचा विशेष उपयोग होणार आहे. मुले या प्रकाराचा आनंद लुटत आहेत.


सातारा येथील समता शिक्षण संस्थेतील मूकबधीर व मतिमंद मुलांना नृत्याचे प्रशिक्षण देताना वालिद घेझ आणि अ‍ॅलिस ड्युपाँट कॉचेट.

Web Title: French artists make dance lessons for idiots!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.