संगणक चालकांचा शुक्रवारी मोर्चा
By Admin | Published: June 8, 2016 02:49 AM2016-06-08T02:49:01+5:302016-06-08T02:49:01+5:30
संगणक परीचालक आपल्या मागण्यांची तड लावण्यासाठी १० जून रोजी विधान भवनावर धडकणार असल्याची माहिती मोखाडा तालुका अध्यक्ष भाऊ वाघ व उपाध्यक्ष कल्पेश लोखंडे यांनी लोकमत ला दिली
मोखाडा : राज्यातील संग्राम प्रकल्पातील सुमारे २७ हजार संगणक परीचालक आपल्या मागण्यांची तड लावण्यासाठी १० जून रोजी विधान भवनावर धडकणार असल्याची माहिती मोखाडा तालुका अध्यक्ष भाऊ वाघ व उपाध्यक्ष कल्पेश लोखंडे यांनी लोकमत ला दिली
मागील चार वर्षांत ग्रामविकास विभागात अंतर्गत महाआॅनलाईन कडून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत असणाऱ्या संगणक परीचालकांना सलग तीन वर्षे संग्राम प्रकल्प देशात प्रथम क्र मांक वर ठेवला तरी देखील शासनाने या परीचालकांची पिळवणूक केली असून या परीचालकांना तुटपुंजे मानधन देऊन त्यांना आर्थिक व मानसिक त्रास दिला आहे. या परीचालकांना पंधरा हजार मासिक वेतन द्यावे या प्रमुख मागणीसाठी गेल्या दोन वर्षांत अनेकदा आंदोलने झालीत. तेव्हा मुख्यमंत्री, ग्रामविकास राज्य मंत्री यांनी फक्त पोकळ आश्वासनेच दिलीत. परंतु शासनाने कोणताच ठोस निर्णय न घेतल्यामुळे १० जून रोजी विधानभवनावर भव्य मोर्चा जाणार आहे. (वार्ताहर)