शुक्रवार नव्हे 'स्टेटसवार'
By admin | Published: February 25, 2017 12:53 PM2017-02-25T12:53:09+5:302017-02-25T12:53:09+5:30
शुक्रवारचा दिवस व्हॉट्सअॅप युझर्स साठी तसा सुखद धक्का देणारा ठरला कारण व्हॉट्सअॅपने नवीन स्टेटस अपडेट हे फिचर रात्रीतून व्हॉट्सअॅप युझर्ससाठी अपडेट केले .
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
शुक्रवारचा दिवस व्हॉट्सअॅप युझर्स साठी तसा सुखद धक्का देणारा ठरला कारण व्हॉट्सअॅपने नवीन स्टेटस अपडेट हे फिचर रात्रीतून व्हॉट्सअॅप युझर्ससाठी अपडेट केले . सकाळी जेव्हा अनेकांनी व्हॉट्सअॅप ओपन केले तेव्हा त्यांना धक्काच बसला .कारण या पूर्वी व्हॉट्सअॅप युझर्सला केवळ टेक्स्ट स्टेटस बघायची सवय होती जसे कि कोणी आपले नाव ठेवायचे ,कोणी ऑफिस मध्ये असेल तर ' इन ऑफिस ' असे स्टेटस ठेवत असे. जर कोणी फॅमिलीसोबत टूर वर असेल तर 'फॅमिली टूर ' असे स्टेटस ठेवायचे.
काही जण तर 'हे देअर , आय एम युजींग व्हॉट्सअॅप ' याच व्हॉट्सअॅपच्या डिफाल्ट स्टेटसवर कायम असायचे . थोडक्यात काय तर 'सध्या तुम्ही काय करता ' हे आपल्या मित्रांना कळावे यासाठी हे स्टेटस फिचर वापरले जायचे. मात्र शुक्रवारी सकाळी अनेकांनी जेव्हा 'आपले मित्र सध्या काय करतात ' हेच दिसत नव्हते तेव्हा अनेकांना वाटले कि फक्त त्यांच्याच व्हॉट्सअॅपला काही प्रॉब्लेम झाला आहे. मात्र अनेकांनी फोनाफोनी करून एक निष्कर्ष काढला कि व्हॉट्सअॅपने काही तरी बदल केला आहे. तेव्हा मात्र व्हॉट्सअॅपचे काही तरी नवीन अपडेट आले असल्याची चर्चा दिवसभर टेक्नोसॅव्ही लोकांमध्ये होती .
काय आहे नवीन व्हॉट्सअॅप स्टेटस फिचर ?
व्हॉट्सअॅपचा वापर जगभरात सगळ्यात जास्त होतो आहे. व्हॉट्सअॅप सध्या जगातील सर्वाधिक वापरले जाणारे मेसेंजर अॅप आहे. आपल्या युझर्स ला नेहमी नविन नविन फिचर्स देण्यासाठी सुद्धा व्हॉट्सअॅप नेहमी पुढे असतो. याच कारणामुळे दररोज व्हॉट्सअॅपचा वापर करणाऱ्या युझर्स ची संख्या वाढतच आहे. आता व्हॉट्सअॅप ने त्यांच्या युझर्सला अजून एक नविन फिचरची भेट दिली आहे ते म्हणजे नविन व्हॉट्सअॅप 'स्टेटस' फिचर .जसे स्नॅपचॅट आणि इंस्टाग्राम वर स्टोरीज असतात त्याच धर्तीवर व्हॉट्सअॅपने त्यांच्या नविन स्टेटस मध्ये बदल केले आहे. जसे कि आता तुमचे व्हॉट्सअॅप स्टेटस म्हणून तुम्ही तुमचा फोटो ,व्हिडिओ ,तसेच जिआयएफ सुद्धा ठेऊ शकता.
त्यासाठी व्हॉट्सअॅपने तुमच्या होम स्क्रीनमध्ये काही बदल केले आहे जसे कि आता होम स्क्रीनवर आधी कॅमेरा असतो त्यानंतर चॅट त्यानंतर स्टेटस आणि शेवटी कॉल्स हे नवीन पर्याय पर्याय आता व्हॉट्सअॅपच्या होम स्क्रीन वर दिसतात. यापैकी 'स्टेटस ' वर क्लिक केले असता त्यामध्ये 'माय स्टेटस ' दिसेल त्याचा वापर करून तुम्ही तुमचे स्टेटस फोटो ,व्हिडिओ किंवा जिआयएफ ठेऊ शकता .विशेष म्हणजे हे तुमचे स्टेटस फक्त पुढच्या चोवीस तासांसाठीच असेल . त्यानंतर हे स्टेटस आपोआप निघूस जाईल . यासोबत तुमचे हे स्टेटस कोणाला दिसावे हे सुद्धा तुम्ही स्टेटस प्रायव्हसी मध्ये जाऊन सेट करू शकता .