शुक्रवारपासून उजनीत पाणी सोडणार
By admin | Published: January 13, 2016 01:25 AM2016-01-13T01:25:26+5:302016-01-13T01:25:26+5:30
महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील भिमा आसखेड आणि चासकमान धरणातून १५ जानेवारीपासून उजनी धरणात तीन टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे.
पुणे : महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील भिमा आसखेड आणि चासकमान धरणातून १५ जानेवारीपासून उजनी धरणात तीन टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेता चोख पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात येणार असून, नदीजवळच्या शेती पंपाचा विद्युत पुरवठा किमात सात दिवस खंडीत करण्यात येणार आहे. नदीच्या पात्रातील सर्व केटीवेअर बंधारे भरुन पाणी पुढे सोडले जाणार असल्याने उजनीत किती पाणी पोहोचणार याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
पुणे जिल्ह्यातील भामा आसखेड, चासकमान,आंध्रा व मुळशी धरणांतील दहा टीएमसी पाणी सोलापूरच्या उजनी धरणात सोडण्याचा आदेश आॅक्टोबरमध्ये जलसंपत्ती प्राधिकरणाने दिला होता. त्यावरून मोठे रणकंदन सुरू झाले होते. काहींनी निणर्यावरोधात प्राधिकरण व मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केल्या होत्या.
जलसंपत्ती प्राधिकरणाने मागील आठवड्यात भामा आसखेड धरणातून सुमारे दोन टीएमसी व चासकमान धरणातून सुमारे एक टीएमसी पाणी असे एकूण सुमारे तीन टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिले
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाणी सोडण्याबाबतचे नियोजन झाले असून येत्या १५ जानेवारी पासून २२ जानेवारी या कालावधीत दोन्ही धरणांमधून उजनीत पाणी सोडण्यात येणार आहे.