आज मैत्री दिवस

By admin | Published: August 7, 2016 10:03 AM2016-08-07T10:03:57+5:302016-08-07T10:03:57+5:30

माझ्या सर्व मित्राना मैत्री दिवसाच्या शुभेच्छा नवनवे "डे‘ आपल्या आयुष्यात येत आहेत किंवा आणले जात आहेत. आक्रमक मार्केटिंगच्या काळात आपल्या जगण्याचे बरेचसे संदर्भ बदलून गेले आहेत.

Friendship Day Today | आज मैत्री दिवस

आज मैत्री दिवस

Next
style="text-align: justify;">संजीव वेलणकर 
 
“मैत्री”ना सजवायची असतेना गाजवायची असते
ती तर नुसती रुजवायची असते
मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ना घ्यायचा असतो.
इथे फक्त जीव लावायचा असतो.
 
पुणे, दि. ७ - माझ्या सर्व मित्राना मैत्री दिवसाच्या शुभेच्छा नवनवे "डे‘ आपल्या आयुष्यात येत आहेत किंवा आणले जात आहेत. आक्रमक मार्केटिंगच्या काळात आपल्या जगण्याचे बरेचसे संदर्भ बदलून गेले आहेत. तुम्ही काय खाता यापेक्षा कुठे खाता; काय करता यापेक्षा कुठे करता आणि आनंद आतून उमलून येण्यापेक्षा तो व्यक्त कसा करता याला किंचित जास्त महत्त्व येऊ लागले आहे. 
फादर्स डे, मदर्स डे, व्हॅलेंटाईन डे किंवा आजचा फ्रेंडशिप डे याच साखळीतून वाढीस लागलेली एक अभिव्यक्तीची शैली आहे. आई-बाबांविषयीचा आदर असो, प्रेम असो किंवा आयुष्यभराची मैत्री असो, या सगळ्यांना एक-एक खास "दिवस‘ मिळाला आहे. नवे पंचांगच जणू साकार होत आहे आणि आपणही त्याला कधी अनुसरू लागलो, हे आपल्यालाही कळले नाही. अर्थातच हा काळाचाच महिमा. पण या काळाचे हे एवढेच वैशिष्ट्य नाही. 
काळाच्या या टप्प्यावर मैत्रीची परिमाणे बदलली आहेत. मैत्रीचा परीघ नवनव्या तंत्रज्ञानांनी कसा आणि किती रुंदावला आहे, यावर नजर टाकली तरी थक्क व्हायला होते. या दृष्टीने पाहिले तर मैत्रीचा उत्सव साजरा करायला काही हरकत नाही. पूर्वी "बिछडे हुअे भाई किंवा दोस्त‘ एखाद्या यात्रेत हरवून अनेक वर्षांनी एखाद्या जत्रेत एकत्र आलेले दिसत, ते केवळ हिंदी चित्रपटांत. पण आता मात्र वास्तवातही अशा विलक्षण योगायोगांची शक्‍यता कैक पटींनी वाढली आहे. 
काही दशकांपूर्वी ज्यांना काही कारणांमुळे शाळेतील मित्र-मैत्रिणींशी संपर्क राखता आला नाही, त्यांनाही या आधुनिक जगामध्ये पुन्हा एकत्र येण्याचे व्यासपीठ मिळाले आहे. मैत्रीचे सेतू उभारण्यासाठी आज अनेक साधने अक्षरश: हात जोडून उभी आहेत. फेसबुक-गुगल प्लस-टम्बलर-लिंक्‍डइन-ट्विटर-जीटॉक-व्हॉट्‌सऍप-व्हॉईस चॅट अशी अनेक.जो इंटरनेट वापरतो, त्याला या सोशल नेटवर्किंग साईट्‌सची निदान तोंडओळख तरी असतेच. मैत्री करा- मैत्री जपा- मैत्री वाढवा, असा जणू मंत्रजागरच अखंड चालू आहे. 
जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात असणाऱ्या मित्राला आपल्या आनंदात सहभागी करून घ्यायचेय? मग त्याला फेसबुकच्या फोटोवर टॅग करा.. एखादी विनोदी घटना त्याला सांगायची आहे? तर व्हॉट्‌सऍप-व्हॉईस चॅटवरून त्याला मेसेज करा.. तुम्ही काढलेले फोटो पिकासावर अपलोड करून त्याला दाखवा.. हे सगळे क्षणार्धात होईल इतके हे आभासी जग तुमच्या-आमच्या जवळ आले आहे. पण सच्च्या मैत्रीची तहान केवळ तेवढ्याने भागेल असे नाही. सायबर विश्‍वाने आपल्या पुढ्यात आणून ठेवलेल्या साऱ्या सुविधा वापरत मैत्रीचे नवे सेतू उभारणे हे शेवटी माणसाच्या मनोवृत्तीतच असायला हवे.
पहिला आंबा कधी खाल्ला, शाळेत गृहपाठ केला नाही म्हणून पहिल्यांदा शिक्षा कधी भोगली आणि पहिला मित्र कधी मिळाला, या तीन गोष्टी अचूक आठवणे कठीण असते असे म्हणतात. अर्थात, हे पर्सनल मैत्रीविषयी आहे. कारण आता फेसबुकवर मित्र मिळाल्याची तारीखही पाहता येते. त्यामुळे ही म्हण तिथे लागू नाही. कारण, सगळेच किती गोड-गोड अशा तिथल्या आभासी जगामध्ये निर्माण झालेल्या मैत्रीतले भांडण ही कन्सेप्ट फार कुणाला अनुभवता येत असेल की नाही माहिती नाही. 
पण म्हणून या आभासी मैत्रीला नावे ठेवण्याचेही काही कारण नाही. ताटातूट झालेले दोन भाऊ फेसबुकमुळे पुन्हा एकत्र आल्याची घटना अलीकडेच घडली. मैत्री टिकवण्याचे काम या सोशल नेटवर्किंग साईट्‌सवरून होत असले, तरीही ती मैत्री रुजते-फुलते आणि दृढ होते ती वेव्ह लेंग्थ जुळल्यानंतरच. त्यांनाही जिवाभावाचे साथीदार हवेच आहेत आणि तसे ते मिळतातही. आधीच्या पिढीमध्ये ते रस्त्यावर, शाळेत, कॉलेजमध्ये, मैदानावर, घराच्या बाहेर भेटत होते. 
आता हेच मित्र ऑनलाइनच्या व्हर्च्युअल जगामध्ये भेटतात. त्यांचे हे नवे कट्टे आणि नवे अड्डेच आहेत. मैत्री तीच, तिचे माहात्म्यही तेच; फक्त भेटण्याच्या जागा बदलल्या. रोज भेटून गप्पा मारण्याची जागा व्हॉट्‌सऍपच्या चॅटबॉक्‍सने घेतली इतकाच काय तो फरक! 
 
 

Web Title: Friendship Day Today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.