भोगलगाव ते सिंगापूर, आईला ‘फॉरिन’ला नेणाऱ्या लेकाची प्रेमळ गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 11:08 AM2023-01-29T11:08:07+5:302023-01-29T11:08:20+5:30

Mother & Son: ब्लॉकचेन तज्ज्ञ असलेला दत्तात्रय सिंगापूरमध्ये नोकरी करतो आणि ‘फॉरिन’ नावाचे फक्त ऐकलेले जग आपल्या आईनेही पाहावे म्हणून तो आईला सिंगापूरला घेऊन गेला.

From Bhogalgaon to Singapore, the loving story of a Son who takes her mother to 'Foreign'! | भोगलगाव ते सिंगापूर, आईला ‘फॉरिन’ला नेणाऱ्या लेकाची प्रेमळ गोष्ट!

भोगलगाव ते सिंगापूर, आईला ‘फॉरिन’ला नेणाऱ्या लेकाची प्रेमळ गोष्ट!

googlenewsNext

बीड : बीड जिल्ह्यातले भोगलगाव ते सिंगापूर, शेतमजुरी ते ब्लॉकचेन हा प्रवास दत्तात्रय जाधवसाठी सोपा नव्हता; पण तो करतानाच त्याच्या मनात होते की, आपण जी काही प्रगती करू त्यात आपले कुटुंब, आपली आई आपल्यासोबत हवी. तो दहावीत असतानाच वडील गेले; पण भाऊ, आई यांच्या साथीने त्याने आपल्या जगण्याला मेहनतीची चाके लावली. आज ब्लॉकचेन तज्ज्ञ असलेला दत्तात्रय सिंगापूरमध्ये नोकरी करतो आणि ‘फॉरिन’ नावाचे फक्त ऐकलेले जग आपल्या आईनेही पाहावे म्हणून तो आईला सिंगापूरला घेऊन गेला. त्याचसंदर्भात त्याने लिहिलेली एक पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली.  

सोशल मीडियात लिहिलेल्या पोस्टमध्ये दत्तात्रय म्हणतो, ‘‘खेड्यात आईने आयुष्यभर कष्ट केले. तिने कधी विमान पाहिले नव्हते, आता विदेशातले लेकाचे जग, ऑफिस पाहून तिच्या नजरेत अभिमान, आनंद आहे. मी सगळ्यांना एकच सांगतो, आपले नवीन जग, विदेश आपल्या पालकांनाही दाखवा, त्यांना होणारा आनंद मोजता नाही येणार!’’ दत्तात्रय ब्लॉकचेनसह हॅकिंग विषयातला तज्ज्ञ आहे. त्याने आजवर अनेक हॅकॅथॉन जिंकले आहेत.

पिवळे लुगडे अन्‌ सिंगापूर
nपिवळे लुगडे नेसून सिंगापूरला लेकाचे ऑफिस पाहायला गेलेली आई आणि तिचा प्रेमळ लेक अर्थात सोशल मीडियात व्हायरल झाला. दत्तात्रयशी ‘लोकमत’ने संपर्क केला तर तो म्हणाला, “भोगलगावातले दिवस आठवतात मला अजूनही. वडील, भाऊ, आई शेतमजुरी करीत. 
nमला एकच माहिती होते की ही परिस्थिती बदलायची तर मला मेहनत, अभ्यासच करायला हवा. बीसीएस केले औरंगाबादला, काही क्लासेस लावले हैदराबादला आणि मला चांगली नोकरी मिळाली; पण आईला तेव्हा हैदराबादलाही नेता आले नाही; पण पुढे पुण्यात नोकरीला लागलो आणि मी आईला सोबत घेऊन गेलो. पुतण्या शिकायला आला. 
nमनात एकच होते, सुखाचे दिवस आले तर आई सोबत हवीच. पत्नीही मला समविचारी मिळाली. सिंगापूरला नोकरी लागली आणि इथे स्थिरावताच मी आईला सिंगापूरला घेऊन आलाे.’’

Web Title: From Bhogalgaon to Singapore, the loving story of a Son who takes her mother to 'Foreign'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.