'या' विधानसभा मतदारसंघावरून भाजपमध्येच मोठं घमासान, मुनगंटीवार थेट दिल्ली गाठणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 01:48 PM2024-10-25T13:48:17+5:302024-10-25T13:49:00+5:30

"निष्ठावान आणि ज्याने पाच वर्षे नव्हे तर 25-25 वर्षे पक्षाचे काम केल आहे, पक्ष संघटना वाढवली आहे. त्यांना तिकीट देण्याऐवजी आयात करून तिकीट दिली, तर संघटन विस्कळित होण्याची शक्यता आहे. फक्त निवडणूक लक्षात घेऊन निवडणुकीतले निर्णय केले, तर नंतर मात्र संघटन पूर्णपणे सेवाभावी संघटनेऐवजी व्यवसायिक संघटन होईल. "

From Chandrapur Assembly Constituency, there will be a lot of trouble in the BJP itself, sudhir Mungantiwar will go to Delhi directly  | 'या' विधानसभा मतदारसंघावरून भाजपमध्येच मोठं घमासान, मुनगंटीवार थेट दिल्ली गाठणार

'या' विधानसभा मतदारसंघावरून भाजपमध्येच मोठं घमासान, मुनगंटीवार थेट दिल्ली गाठणार

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्व पक्ष राजकीय जुळवाजुळव करताना दिसत आहेत. बंडखोरी करून एका पक्षातील नेते दुसऱ्या पक्षात जाताना दिसत आहेत. त्यांना संबंधित पक्ष तिकीटही देत आहेत. आता अशाच मुद्यावरून चंद्रपूर विधानसभा मदारसंघासंदर्भात भाजपमध्ये घमासान सुरू झाल्याचे दिसत आहे. निष्ठावान आणि ज्याने पाच वर्षे नव्हे तर 25-25 वर्षे पक्षाचे काम केल आहे, पक्ष संघटना वाढवली आहे. त्यांना तिकीट देण्याऐवजी आयात करून तिकीट दिली, तर संघटन विस्कळित होण्याची शक्यता आहे. फक्त निवडणूक लक्षात घेऊन निवडणुकीतले निर्णय केले, तर नंतर मात्र संघटन पूर्णपणे सेवाभावी संघटनेऐवजी व्यवसायिक संघटन होईल. म्हणून आपण पक्षाच्या कार्यकर्त्यांची भूमिका, त्यांचे मत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी दिल्लीला चालोलो आहोत, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. ते एबीपी माझ्यासोबत बोलत होते.

मुनगंटीवार म्हणाले, "काही राजकीय कामासाठी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांची भूमिका, त्यांचे मत हे आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी मी दिल्लीला चालोलो आहे. त्यांची बाजू मांडण्यापेक्षाही चंद्रपूर विधानसभेच्या संदर्भात कार्यकर्त्यांची इच्छा आहे की, ज्यांनी पाच वर्ष काम केले त्यांना तिकीट द्यायला हवे अन्यथा भविष्यात कुणीही कार्यकर्ता संघटन चालवण्यासाठी काम करणार नाही. निष्ठावान, ज्याने पाच वर्ष नव्हे तर 25-25 वर्ष पक्षाचे काम केल आहे, पक्ष संघटना वाढवली.त्यांना तिकीट देण्याऐवजी आयात करून तिकीटं दिली, तर संघटन विस्कळित होण्याची शक्यता आहे."

"ज्या उमेदवारांनी पाच वर्षांत अनेक पक्ष बदलले, त्यांना तिकीट देण्याचा विचार जर पक्ष करत असेल, तर यातून कार्यकर्त्यांच्या मनात नाराजी निर्माण होते आणि पक्षाचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून ही नाराजी अवगत केली पाहीजे. शेवटी पक्षाने, नेतृत्वाने काय निर्णय करायचा हा त्यांचा अधिकार आहे. पण पक्षाच्या नेत्यांपर्यंत कार्यकर्त्यांची नाराजी पोहोचवली नहा, संघटनेच्या संदर्भातला भाव आणि आशय पोहोचवला नाही, फक्त निवडणूक लक्षात घेऊन निवडणुकीतले निर्णय केले, तर नंतर मात्र संघटन पूर्णपणे सेवाभावी संघटनेच्या ऐवजी व्यवसायिक संघटन होईल," असे मुनगंटीवार म्हणाले.

"काल साधारणपणे पाच-सातशे कार्यकर्ते आले, त्यांनी आग्रह केला की, आमची भावना, आम्ही सातशे लोक तर जाऊ शत नाही, पण आमची भावना तुम्ही तरी पोहोचवा. कारण आम्ही तुमच्यासोबत काम करतो आणि तुम्ही जर ही भावना पोहोचली नाही, तर नेत्यांच्या हे लक्षात येणार नाही की, तीव्रता काय आहे? असंतोष काय आहे? मनाची भावना काय आहे? वारंवार निष्ठा बदलणाऱ्यांना, पक्ष बदलणाऱ्यांना आपण तिकीटं दिली, तर उद्या पक्षाचा प्रत्येक कार्यकर्त्या महानगर पालिका असेल किंवा कुठलीही निवडणूक असेल, अशाच पद्धतीने निष्ठा बदलेल. एक निष्ठ राहण्याचा तो प्रत्न करणार नाही," असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

मुनगंटीवारांनी सांगितला मनातला उमेदवार -
चंद्रपूरमधून कुणाला तिकीट द्यायला हवे? यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, "आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांपैकी द्यायला हवे. प्रामुख्याने ब्रिजभूषण पाझारे यांना द्यायला हवे. कारण 1990 पासून ते काम करत आहेत. ते जिल्हापरिषदेत सभापती होते. पंचायत समितीचे सदस्य राहिले आहेत. त्यांनी जीजी निवडणूक लढवली तीती जिंकली आहे. कार्यकर्त्यांसोबत त्यांची चांगली वर्तनूक आहे. आता निष्ठेने राहणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी जर पक्ष राहिला नाही तर..., मी समजू शकतो की एखाद्याला पक्षात घेऊन जर तिकीट दिले, तर ती त्यावेळची गरज असते. पण पाच वर्षांत अनेकदा पक्ष बदलणाऱ्यांना तिकीट देण्याची पद्धत सुरू केली तर त्यातून मात्र कार्यक्रत्यांच्या मनावर त्याचा वाईट परिणाम होईल आणि पुढे त्या पक्षाला संघटित ठेवणे, कार्यकर्त्यांना संघटित ठेवणे त्यांच्यासमोर भूमिका मांडणे, अवघड होते.

Web Title: From Chandrapur Assembly Constituency, there will be a lot of trouble in the BJP itself, sudhir Mungantiwar will go to Delhi directly 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.