पानसरे मारेक-यांच्या अटकेसाठी मोर्चा

By admin | Published: March 9, 2015 01:40 AM2015-03-09T01:40:41+5:302015-03-09T01:40:41+5:30

कष्टकऱ्यांचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांची हत्या होऊन १५ दिवस उलटले तरी पोलिसांच्या हाती काहीच लागले नसल्याच्या निषेधार्थ रविवारी घरकामगार व शेतमजूर महिलांनी मोर्चा काढला.

Front for the arrest of Pansare Marek | पानसरे मारेक-यांच्या अटकेसाठी मोर्चा

पानसरे मारेक-यांच्या अटकेसाठी मोर्चा

Next

कोल्हापूर : कष्टकऱ्यांचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांची हत्या होऊन १५ दिवस उलटले तरी पोलिसांच्या हाती काहीच लागले नसल्याच्या निषेधार्थ रविवारी घरकामगार व शेतमजूर महिलांनी मोर्चा काढला.
आयटक संलग्न कामगारांनी काढलेल्या मोर्चाचे स्थानिक नेते दिलीप पवार यांनी नेतृत्व केले. विवेकनिष्ठ विचारांना उत्तर देता येत नसल्याने माणसे मारण्याचे काम काही मंडळींनी सुरू केले आहे. दाभोलकर यांच्या हत्येनंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणाऱ्यांचे आता कोणी हात धरले आहेत? पानसरेंच्या मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा; अन्यथा खुर्ची सोडा, अशी मागणी पवार यांनी केली. पानसरेंच्या मारेकऱ्यांना पकडण्याचे केवळ नाटक करू नका, अटक करा; अन्यथा जनता रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशाराही कामगारांनी दिला.

Web Title: Front for the arrest of Pansare Marek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.