डोळ्यांसमोरच गाडी गेली चोरीला

By admin | Published: May 16, 2016 01:32 AM2016-05-16T01:32:11+5:302016-05-16T01:32:11+5:30

पार्किंगमध्ये लावलेली मोटार चोरट्यांनी डोळ्यांसमोर चोरून पळून गेल्याची घटना येथे घडली

In front of the eyes, the car is stolen | डोळ्यांसमोरच गाडी गेली चोरीला

डोळ्यांसमोरच गाडी गेली चोरीला

Next

नेहरुनगर : पार्किंगमध्ये लावलेली मोटार चोरट्यांनी डोळ्यांसमोर चोरून पळून गेल्याची घटना येथे घडली. तसेच दुसऱ्या घटनेत घरासमोर लावलेली मोटार चोरून नेली.
रवींद्र भगवान मोड़क (वय ४१, रा मोड़क निवास, नेहरुनगर, पिंपरी) मिळालेल्या माहितीनुसार, मोडक हे शुक्रवारी रात्री कामावरून आल्यानंतर त्यांनी मोटार (क्रमांक एमएच १४ सीके ८०८९) त्यांच्या घरासमोर पार्किंगमध्ये लावली होती. शनिवारी पहाटे ३:४० सुमारास मोड़क यांच्या घरासमोर राहणाऱ्या एका व्यक्तीला मोड़क यांच्या मोटारीजवळ तीन व्यक्ती संशयरीत्या हालचाली करीत असल्याचे आढळून आले. त्यांनी तातडीने मोड़क यांना संपर्क साधून याची माहिती सांगितली. मोड़क यांनी आपल्या सदनिकामधून बाहेर येऊन पाहिले असता, चोरटे त्यांची मोटार चोरून नेत असल्याचे पाहिले. त्यांनी चोर चोर म्हणून आरडाओरडा करीत पार्किंगमध्ये आले असता चोरट्यांनी त्यांच्या समक्ष डोळ्यांसमोर त्यांची मोटार चोरून नेली.
दुसऱ्या घटनेत शेषप्पा चद्रंप्पा नाटेकर (वय ६३, रा. प्रगती शाळेजवळ, नेहरुनगर, पिंपरी) त्यांनी त्यांची मोटार १० मे रोजी त्यांच्या घरासमोर रस्त्यावर लावली होती. त्यांनी पहाटे १ वाजता मोटार पाहिली होती. सकाळी ७ वाजता पाहिली असता, मोटार चोरून नेल्याचे समोर आले. त्यांनी या प्रकरणी संत तुकारामनगर पोलीस चौकीत तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: In front of the eyes, the car is stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.