एफआरपीसाठी मोर्चा
By admin | Published: October 17, 2015 03:19 AM2015-10-17T03:19:46+5:302015-10-17T03:19:46+5:30
‘शेतकऱ्यांनी परिवर्तन केले म्हणून भाजपा-शिवसेनेचे सरकार आले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले; अन्यथा त्यांच्या आयुष्यात मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळाली नसती
कोल्हापूर : ‘शेतकऱ्यांनी परिवर्तन केले म्हणून भाजपा-शिवसेनेचे सरकार आले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले; अन्यथा त्यांच्या आयुष्यात मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळाली नसती, याचे भान ठेवून फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने राहावे. नाही तर पुढील वर्ष सरकारसाठी वाईट जाईल,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला. एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘स्वाभिमानी’ने शुक्रवारी कोल्हापूर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर इशारा मोर्चा काढत साखर कारखानदारांसह सरकारला तंबी दिली.
खासदार शेट्टी म्हणाले, ‘या वर्षी साखरेला २८०० रुपये दर आहे. दुष्काळामुळे उसाचे उत्पादन कमी होणार आहे. त्यामुळे साखरेचे उत्पादनही कमी होणार असल्याने साखरेचे दर तीन हजारांच्या वर जातील. त्यामुळे एकरकमी ‘एफआरपी’ देण्यास अडचण येणार नाही. तरीही कारखानदारांनी रडीचा डाव केला, तर ‘एफआरपी’ वसूल केल्याशिवाय राहणार नाही. साखर कारखान्यांच्या सभेत टप्प्याटप्प्याने ‘एफआरपी’ देण्याचे बेकायदा ठराव केले आहेत. हे ठराव त्यांना मागे घ्यावे लागणार आहेत. तसेच राज्यातील विभागीय साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढून इशारा देणार आहे. ६ नोव्हेंबरपर्यंत सरकार काय करते ते बघूया. सरकार कारखानदारांच्या बाजूने राहिले तर सरकारविरोधात बंड करावे लागेल.