साताऱ्यात पतीसमोरच महिलेवर सामूहिक अत्याचार
By admin | Published: June 20, 2017 01:36 AM2017-06-20T01:36:56+5:302017-06-20T01:36:56+5:30
रात्रीच्या वेळी निर्जन ठिकाणी आलेल्या दाम्पत्याला जिवे मारण्याची धमकी देत दोघांनी महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना शहरालगत वाढे फाटा येथे घडली
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : रात्रीच्या वेळी निर्जन ठिकाणी आलेल्या दाम्पत्याला जिवे मारण्याची धमकी देत दोघांनी महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना शहरालगत वाढे फाटा येथे घडली. स्थानिकांनी विशाल मुकाप्पा कोळी व नवनाथ प्रकाश जाधव (दोघे रा. लक्ष्मीटेकडी झोपडपट्टी) या संशयितांना घटनास्थळीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामानिमित्त शहरालगत वाढे फाटा येथे आलेल्या गृहस्थाने पत्नीलाही तिकडे बोलावून घेतले. रात्री साडेदहाच्या सुमारास दोघे जवळच्या कालव्याकडे गप्पा मारत गेले. निर्मनुष्य ठिकाणी आल्याचे पाहून दोघांनी जिवे मारण्याची धमकी देत पतीदेखत महिलेवर अत्याचार केला. दाम्पत्याने आरडाओरडा केल्याने लोक गोळा झाले आणि त्यांनी पळून चाललेल्या दोघा संशयितांना पकडले.