कोकणकन्या एक्स्प्रेसच्या टॉयलेटमध्ये अडकला आजींचा पाय
By admin | Published: December 11, 2015 02:44 PM2015-12-11T14:44:42+5:302015-12-11T14:45:40+5:30
कोकणकन्या एक्स्प्रेसच्या टॉयलेटमध्ये एका वृद्ध महिलेचा पाय अडकल्याची विचित्र घटना आज घडली. तब्बल ११ तासांच्या प्रयत्नांनतर त्या आजीबाईंचा पाय अखेर शौचकुपातून सोडवण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले.
Next
>ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. ११ - कोकणकन्या एक्स्प्रेसच्या टॉयलेटमध्ये एका वृद्ध महिलेचा पाय अडकल्याची विचित्र घटना आज घडली. तब्बल ११ तासांच्या प्रयत्नांनतर त्या आजीबाईंचा पाय अखेर शौचकुपातून सोडवण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले. कटरने टॉयलेट कापून त्या आजींना बाहेर काढण्यात आले.
मुंबईहून मडगावच्या दिशेने जाणा-या एक्स्प्रेसमधून प्रवास करणा-या रबिया शेख ( वय ६८) या आजी पहाटेच्या सुमारास टॉयलेटला गेल्या असता टॉयलेटच्या होलमध्ये त्यांचा पाय अडकला. बराच वेल होऊनही त्या परत न आल्याने त्यांच्या पतीन त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली असता, त्यांचा पाय टॉयलेटमध्ये अडकल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी या प्रकाराची माहिती सहप्रवासी व टीसीला दिली. सकाळी सातच्या सुमारास गाडी रत्नागिरी स्थानकात पोहोचली आणि आजींच्या सुटकेचे प्रयत्न सुरू झाले. मात्र तब्बल दोन तासांनंतरही आजींचा अडकलेला पाय काही सुटेना, हे लक्षात आल्यानंतर कोकणकन्या एक्स्प्रेसचा हा डबा वेगळा करून गाडी पुढे पाठवण्यात आली. आजींचा मांडीपर्यंतचा भाग अडकल्यामुळे कर्मचा-यांसमोर टॉयलेट कापण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. अखेर कटरच्या सहाय्याने तो भाग कापण्याचे काम सुरू झाले आणि ११ तासांच्या प्रयत्नांनतर दुपारी टॉयलेट कापून आजींचा पाय सोडवण्यात कर्मचारी यशस्वी ठरले.