अनुदानावर फळ पिकवणारे तंत्रज्ञान

By admin | Published: December 19, 2015 03:23 AM2015-12-19T03:23:13+5:302015-12-19T03:23:13+5:30

रासायनिक पदार्थांचा वापर न करता फळ पिकवणारे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करणार असल्याची माहिती कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी विधान

Fruit-growing technology | अनुदानावर फळ पिकवणारे तंत्रज्ञान

अनुदानावर फळ पिकवणारे तंत्रज्ञान

Next

नागपूर : रासायनिक पदार्थांचा वापर न करता फळ पिकवणारे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करणार असल्याची माहिती कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत अल्पकालीन चर्चेच्या उत्तरात दिली.
आंबा, केळी, पपई यासह इतर फळे पिकवण्यासाठी रासायनिक पदार्थांचा वापर केल्यास ते आरोग्यासाठी घातक असतात. परंतु नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून रासायनिक पदार्थांचा वापर न करता फळे पिकवता येतील. द्राक्ष, आंबा, संत्रा व केळी अशा फळांसाठी संशोधन केद्र उभारण्यात येणार आहे. याचा फळ बागायतदारांना उपयोग होईल. राज्यात १४ लाख शेतकऱ्यांना ग्रीन कार्ड देण्यात आले. या वर्षात ही संख्या ४० लाखांपर्यंत वाढविण्यात येणार आहे.
चांगल्या दर्जाच्या उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. जैविक खतात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल. बियाणे, कीटकनाशके विक्रीत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी ९६ विक्रे त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
३०९ विक्रे त्यांचे परवाने निलंबित तर ४३ जणांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.१६३ प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)

बीटी बियाण्याच्या किमती कमी करणार
बीटी बियाण्याची वाढती मागणी विचारात घेता हे बियाणे उपलब्ध होण्यासाठी शासनाचे प्रयत्न आहे. या बियाण्याच्या किमती किलोमागे ५०० रुपयांनी कमी क रण्यात येतील. बियाणे व रासायनिक खतांच्या देशभरात सारख्याच किमती असाव्या यासाठी केंद्र सरकार दर निश्चित करणार असल्याची माहिती खडसे यांनी दिली.

Web Title: Fruit-growing technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.