फळभाज्या,पालेभाज्यांचे भाव दुपटीने वाढले

By admin | Published: June 5, 2017 12:47 AM2017-06-05T00:47:07+5:302017-06-05T00:47:07+5:30

चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, बटाटा आवकेत घट झाल्याने भावात या आठवड्यात भाव ही कमी झाले.

Fruit prices have increased in double digits | फळभाज्या,पालेभाज्यांचे भाव दुपटीने वाढले

फळभाज्या,पालेभाज्यांचे भाव दुपटीने वाढले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, बटाटा आवकेत घट झाल्याने भावात या आठवड्यात भाव ही कमी झाले. कांदा, जळगाव भुईमुग शेंगा, बटाटा लसूण भाव कमी झाले.
राजगुरुनगर मार्केटमध्ये या आठवड्यात पालेभाज्यांची आवक कमी झाली. शेलपिंपळगाव उपबाजारात भाज्यांची आवक घटली. चाकणला पालेभाज्यांच्या बाजारात कोथिंबीर, पालक व मेथीची आवक कमी झाली. जनावरांच्या बाजारात बैल, जर्शी गाय, शेळ्या-मेंढ्या व म्हशींच्या संख्येत घट झाली. एकूण उलाढाल ९३ ते ९५ लाख रुपये झाली.
चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक ४५० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक १२५२ क्विंटलने घटल्याने भावात ५० रुपयांची घट झाली. कांद्याचा कमाल भाव ६०० रुपयांवरून ५५० रुपयांवर पोहचला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक ६१५ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ९८५ क्विंटलने घटली व कमाल भाव ८०० रुपये झाले. जळगाव भूईमुग शेंगाची एकूण आवक २ क्विंटल झाली असून, गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ४ क्विंटलने कमी झाली. या शेंगांचा कमाल भावही ६ हजार रुपयांवर आला या सप्ताहात तो १००० रुपयाने वाढला. बंदूक भुईमुग शेंगांचीआवक झाली नाही. लसणाची एकूण आवक २ क्विंटल झाली असून, गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक व ४ क्विंटल ने घटली कमाल भावही ४ हजार रुपयांवर स्थिर झाला.
हिरव्या मिरचीची एकूण आवक ५८ क्विंटल झाली. भावात मोठी वाढ झाली. हिरव्या मिरचीला ६,००० ते ८,००० रुपये असा कमाल भाव मिळाला.
आवक व बाजारभाव : कांदा - एकूण आवक-४५० क्विंटल. भाव क्रमांक १ - ५५० रुपये, भाव क्रमांक २-४०० रुपये, भाव क्रमांक ३-३०० रुपये. बटाटा - एकूण आवक - ६१५ क्विंटल. भाव क्रमांक १-८०० रुपये, भाव क्रमांक २-७०० रुपये, भाव क्रमांक ३-४०० रुपये. फळभाज्या : चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती १० किलोंसाठी डागांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे : टोमॅटो - १८० पेट्या (२००० ते ४००० रू), फ्लॉवर-१९० पोती (८०० ते १४०० रु), वांगी-२१ पोती (४००० ते ५००० रुपये.), भेंडी - २०५ पोती (२००० ते ४००० रुपये), कारली - १० डाग (५० ते ७००० रुपये), दुधीभोपळा - ४२पोती (१५०० ते २५०० रुपये.), काकडी-३२पोती (१५०० ते २५०० रुपये),गवार-११ पोती ( ३५०० ते ४५००); शेवगा - १२ पोती (३००० ते ५००० रुपये).

Web Title: Fruit prices have increased in double digits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.