फळ प्रक्रिया उद्योगाला चालना देणार - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 05:13 AM2017-09-01T05:13:25+5:302017-09-01T05:13:54+5:30

फळशेती शाश्वत होण्यास फळ प्रक्रिया उद्योगाला शासनामार्फत चालना दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. कोका कोला कंपनीच्या ‘मिनीट मेड संत्रा’ या संत्र्याचा पल्प वापरुन तयार करण्यात

 The fruit processing industry will be driven - Chief Minister | फळ प्रक्रिया उद्योगाला चालना देणार - मुख्यमंत्री

फळ प्रक्रिया उद्योगाला चालना देणार - मुख्यमंत्री

Next

मुंबई : फळशेती शाश्वत होण्यास फळ प्रक्रिया उद्योगाला शासनामार्फत चालना दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. कोका कोला कंपनीच्या ‘मिनीट मेड संत्रा’ या संत्र्याचा पल्प वापरुन तयार करण्यात आलेल्या नवीन पेय उत्पादनाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहात झाले.
‘कोका कोला’चे प्रेसिडेंट आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स क्विन्सी म्हणाले, कंपनीने मिनीट मेड मोसंबी या उत्पादनानंतर आता मिनीट मेड संत्रा या उत्पादाचा शुभारंभ करुन ग्राहकांना उत्कृष्ट पेय उपलब्ध करुन देण्याबरोबरच शेतकºयांच्या उत्पादनाला अधिकाधिक बाजारभाव मिळेल या दृष्टीने प्रयत्न केला आहे.
कंपनीच्या फंटा या उत्पादनात फळाच्या रसाचे प्रमाण ५ टक्क्यांवरुन १० टक्क्यावर आणल्यामुळे फळांना आणखी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.
जैन इरिगेशन सिस्टीम्सचे उपाध्यक्ष आणि कार्यकारी संचालक अनिल जैन यांनी यावेळी सांगितले की, जैन कंपनीने ब्राझिलीयन आॅरेंज हा नवीन वाण परदेशातून महाराष्ट्रात आणला व त्यावर संशोधन करुन स्वीट आॅरेंज हा नवीन वाण उत्पादित केला आहे. तसेच हा वाण संत्रा आणि मोसंबी या दोन्ही फळांचे एकत्रित गुण असलेला आहे.
शेतकºयांना उत्पादनासाठी हा नवीन वाण देण्यात आला असून, याचे सध्याच्या संत्रा पिकापेक्षा ३ ते ४ पट अधिक उत्पादन मिळते. कंपनीचा जळगावला अन्न प्रकिया प्रकल्प असून आता मोर्शी, जि. अमरावती येथे संत्रा व मोसंबीवर प्रक्रियेसाठी प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
यावेळी कोका कोलाच्या आशिया पॅसिफीक ग्रुपचे प्रेसिडेंट जॉन मर्फी, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, कोका कोलाचे इंडिया अँड साऊथवेस्ट आशिया विभागाचे प्रेसिडेंट टी. कृष्णकुमार, कंपनीचे एक्झिक्युटीव्ह आणि बॉटलिंग इन्व्हेस्टमेंट्स ग्रुपचे प्रेसिडेंट इरिअल फिनान, तसेच संत्रा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

Web Title:  The fruit processing industry will be driven - Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.