एफटीआयआय विद्यार्थ्यांची ‘नुक्कड’गिरी
By admin | Published: June 18, 2015 02:33 AM2015-06-18T02:33:54+5:302015-06-18T02:33:54+5:30
मैं साहित्य अकादमी विजेता हूँ... मुझे ज्ञानपीठ पुरस्कार मिला हैं... मैं नॅशनल विजेता डायरेक्टर हूँ... नहीं मैं, सिर्फ बीस सालसे पार्टी का काम कर रहा हूँ...
पुणे : ‘मैं साहित्य अकादमी विजेता हूँ... मुझे ज्ञानपीठ पुरस्कार मिला हैं... मैं नॅशनल विजेता डायरेक्टर हूँ... नहीं मैं, सिर्फ बीस सालसे पार्टी का काम कर रहा हूँ... ओह, तो तुम इस पद के लायक हो...’ अशा आशयातून एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्ष पदाच्या निकषांची खिल्ली उडविणारे ‘नुक्कड’ पथनाट्य एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी सादर केले.
फिल्म अॅण्ड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) नियामक मंडळाच्या अध्यक्षपदावर गजेंद्र चौहान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती रद्द करावी, यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे अस्त्र उचलले असून, संस्थेतील अॅक्टिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘नुक्कड’ हे पथनाट्य याचाच एक भाग होते. संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ १५ ते २० विद्यार्थ्यांनी हे पथनाट्य सादर करून आंदोलनाच्या मुद्द्याचे गांभीर्य लोकांना पटवून दिले.
‘महाभारत’ मालिकेत गजेंद्र चौहान यांनी केलेल्या ‘युधिष्ठिर’च्या भूमिकेचे स्मरण करून देण्यासाठी ‘द्रौपदी वस्त्रहरण’चा प्रसंग सादर करण्यात आला.