संमेलनासाठीचा पंचवीस लाखांचा निधी केला परत

By admin | Published: January 19, 2016 04:12 AM2016-01-19T04:12:06+5:302016-01-19T04:12:06+5:30

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारकडून मिळालेला २५ लाख रुपयांचा निधी आयोजक असलेल्या डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाने परत केला आहे.

A fund of 25 lakh rupees was made for the meeting | संमेलनासाठीचा पंचवीस लाखांचा निधी केला परत

संमेलनासाठीचा पंचवीस लाखांचा निधी केला परत

Next

स्वागताध्यक्षांचा निर्णय
विश्वास मोरे / ज्ञानोबा-तुकाराम साहित्यनगरी (पिंपरी) : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारकडून मिळालेला २५ लाख रुपयांचा निधी आयोजक असलेल्या डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाने परत केला आहे. हा निधी साहित्य महामंडळाने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी वापरावा, असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. पी.डी. पाटील यांनी केले.
तीन दिवसांपासून सुरू असलेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सांगता सोमवारी झाली. साहित्यप्रेमींचा उदंड प्रतिसाद आणि सुनियोजनाने हे संमेलन आगळेवेगळे ठरले. श्रीमंती थाटाचे संमेलन अशी टीका झाली; मात्र शासनाकडून मिळालेला निधी परत करून आणि ‘नाम’ फाउंडेशनला १ कोटीची मदत देऊन संयोजक डॉ. पाटील यांनी या टीकेला कृतिशील उत्तर दिले.
डॉ. पाटील म्हणाले, साहित्य संमेलनाच्या संयोजनासाठी राज्य सरकारने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला २५ लाख रुपयांचा निधी दिला होता. तो महामंडळाने संयोजक म्हणून आम्हाला दिला होता. परंतु, आम्ही तो महामंडळाला परत करणार असून, त्याचा उपयोग मराठी भाषेच्या संवर्धनासाठी करावा, अशी अपेक्षा आहे.

Web Title: A fund of 25 lakh rupees was made for the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.