...तर निधी बंद होईल, अनुसूचित जाती आयोगाचा राज्याला इशारा

By Admin | Published: June 13, 2015 03:38 AM2015-06-13T03:38:27+5:302015-06-13T03:38:27+5:30

दलितांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या विशेष निधीपैकी निम्मा निधीदेखील खर्च करण्यात आला नाही. हीच परिस्थिती कायम राहिल्यास केंद्राकडून

... the fund will be shut down, the scheduled caste's signal to the state | ...तर निधी बंद होईल, अनुसूचित जाती आयोगाचा राज्याला इशारा

...तर निधी बंद होईल, अनुसूचित जाती आयोगाचा राज्याला इशारा

googlenewsNext

मुंबई : दलितांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या विशेष निधीपैकी निम्मा निधीदेखील खर्च करण्यात आला नाही. हीच परिस्थिती कायम राहिल्यास केंद्राकडून मिळणारा निधी बंद होईल, असा इशारा अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष डॉ. पी.एल. पुनिया यांनी दिला. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची महाराष्ट्रातील आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पुनिया म्हणाले की, अनुसूचित जातीच्या कल्याणाकरिता केंद्राकडून
५ हजार ८०० कोटींचा निधी राज्याला देण्यात आला.
लाभार्थी मिळत नाहीत, अर्ज नाहीत, दस्तावेज सादर झाले नाहीत अशा कारणांनी निधी पडून आहे. राज्य सरकारच्या चुकांमुळे लाभार्थी मात्र निधीपासून वंचित राहत आहेत. गेल्या वर्षभरात १ लाख ३२ हजार अनुसूचित विद्यार्थ्यांना केंद्राकडून मिळणारी शिष्यवृती मिळाली नसल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

Web Title: ... the fund will be shut down, the scheduled caste's signal to the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.