मुंबईकरांसाठी निधी मिळाला; खर्चाचे टेन्शन

By admin | Published: February 27, 2015 02:59 AM2015-02-27T02:59:42+5:302015-02-27T02:59:42+5:30

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबई, ठाणेकरांसाठी अनेक प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला असून, तो खर्च कसा करायचा हेच टेन्शन रेल्वे प्रशासनाला असणार आहे.

Funding for Mumbaiites; Expense Tension | मुंबईकरांसाठी निधी मिळाला; खर्चाचे टेन्शन

मुंबईकरांसाठी निधी मिळाला; खर्चाचे टेन्शन

Next

मुंबई : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबई, ठाणेकरांसाठी अनेक प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला असून, तो खर्च कसा करायचा हेच टेन्शन रेल्वे प्रशासनाला असणार आहे.
एसी लोकल, महिला डब्यात सीसीटीव्ही आणि मुंबई-अहमदाबाद हायस्पीड कॉरीडोर प्रकल्प मार्गी लावण्यावर प्रभूंचा भर असल्याचे दिसून आले आहे. एमयूटीपी-३मधील सात प्रकल्पांसाठी एमआरव्हीसीने ११ हजार कोटीही दिले. यामध्ये राज्य सरकारही ५0 टक्के भागीदार असल्याने त्यांच्याकडूनही निधी मिळेल. यामुळे उपनगरीय लोकल प्रवाशांना दिलासा मिळाला. एमयूटीपी-२मधील रखडलेल्या प्रकल्पांनाही गती देण्यासाठी १,0२४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. यामध्ये रेल्वेकडून ५१२ कोटी मिळणार आहेत. या निधीमुळे सीएसटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्ग, ठाणे ते दिवा पाचवा-सहावा मार्ग, हार्बरचा गोरेगावपर्यंत विस्तार हे प्रकल्प पुढे सरकण्यास मदत मिळेल. या अर्थसंकल्पात पश्चिम रेल्वेला प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्यासाठी १५ कोटींचा निधी खर्च कसा करावा या तणावाखालीच आता असल्याचे रेल्वे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी सांगितले.

Web Title: Funding for Mumbaiites; Expense Tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.