शहीद किरण यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 05:21 AM2018-04-13T05:21:54+5:302018-04-13T05:21:58+5:30
औरंगाबाद जिल्ह्याचे वीरपुत्र शहीद किरण पोपटराव थोरात यांचे पार्थिव गुरुवारी सायंकाळी लष्कराच्या विशेष विमानाने चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले.
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्याचे वीरपुत्र शहीद किरण पोपटराव थोरात यांचे पार्थिव गुरुवारी सायंकाळी लष्कराच्या विशेष विमानाने चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. मूळ गावी फकिराबादवाडी (ता. वैजापूर) येथे शुक्रवारी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. यात युनिट-४ ‘एमएलआय’चे जवान किरण थोरात यांना वीरमरण आले. लष्कराचे नायब सुभेदार संजय पाटील, हवालदार पांडुरंग गोरे हे विशेष विमानाने त्यांचे पार्थिव घेऊन सायंकाळी विमानतळावर दाखल झाले. विमानतळाच्या इमारतीसमोरील चबुतऱ्यावर पार्थिव ठेवण्यात आले.
>अखेरचा संवाद... माझ्या दोन्ही चिमुकल्यांची काळजी घ्या
थोरात यांना वीरमरण आल्याचे कळताच फकिराबादवाडीसह तालुक्यावर शोककळा पसरली. शहीद थोरात यांचे घर शेतवस्तीवर असून तेथे त्यांचे आई वडील, भाऊ, पत्नी, पाच महिन्यांचा मुलगा श्लोक व मोठी मुलगी श्रेया राहते.