जुन्नर-कुर्ला एसटीला भीषण अपघात

By admin | Published: October 18, 2014 10:52 PM2014-10-18T22:52:56+5:302014-10-18T22:52:56+5:30

जुन्नर-कुर्ला एसटी बसने मारुती कारला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 1 ठार, तर 19 जण जखमी झाले. जखमींमधील 7 जणांची प्रकृती गंभीर आह़े

Furious accidents in Junnar-Kurla ST | जुन्नर-कुर्ला एसटीला भीषण अपघात

जुन्नर-कुर्ला एसटीला भीषण अपघात

Next
नारायणगाव :  जुन्नर-कुर्ला एसटी बसने मारुती कारला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 1 ठार, तर 19 जण जखमी झाले. जखमींमधील 7  जणांची प्रकृती गंभीर आह़े  
ही दुर्घटना आज दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास जुन्नर-नारायणगाव रोडवरील पिंपळगाव फाटानजीक घडली, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र थोरात व पोलीस उपनिरीक्षक पद्मभूषण गायकवाड यांनी दिली़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी बसचालक मारुती कारला (एमएच 16-ई 5788) वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असताना एसटी बस  (एमएच 2क्-बीएल 1569) वडाच्या झाडाला जाऊन धडकल्याने एसटीमधील अनेक प्रवासी या अपघातात गंभीर जखमी झाल़े  या अपघातात संभाजी कोंडाजी ढोरे (वय 52, रा़  बारव, ता. जुन्नर) या प्रवाशाचा मृत्यू झाला, तर बसमधील प्रवासी संस्कृती ऊर्फ राणी सिनोलकर (वय 23, रा़  कुमशेत), अंजना नारायण सोनवणो (वय 6क्, रा़  सोनावळे जुन्नर), छगन गेणू घुट्टे (वय 42, रा. देवळे जुन्नर), प्रकाश अभिचंद शहा (वय 58, रा़  अहमदनगर), छगन बाळू दांगट (वय 55, रा.़ उंब्रज), मारुती कारचालक- गणोश दादाभाऊ आल्हाट (वय 24, रा़ निरगुडे) व कारमधील सहप्रवासी प्रवीण रंगनाथ बेल्हेकर (वय 59, रा़  निरगुडे)  हे गंभीर जखमी झाले आहेत.़ त्याचबरोबर एसटी बसचालक दत्तात्रय जयसिंग नवले (वय 42, रा़ कुर्ला, मुंबई), वाहक पांडुरंग धोंडू भांगे (रा़ कुर्ला मुंबई), भगवान तुकाराम ढोमसे (रा. जुन्नर), गायत्री राजकुमार द्गडे (वय 16), बाळू प्रभाकर गायकवाड (16), ओंकार रमेश गाडेकर (वय 14), सचिन दत्तात्रय शिंदे (वय 35, सर्व रा. जुन्नर), अनिता सुरेश पंडित (वय 4क्, रा़  कुंभारवाडा, जुन्नर), नीलेश निवृत्ती ढोले (रा़  खेड), वनिता बबन मांजरे (वय 32, रा़ मांजरेवाडी, खेड) व रिया रोहिदास बोंबले (वय 32, रा़. वेताळे, खेड) हे जखमी झाले आहेत. काही जखमींना नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात, तर काहींना भोसले रुग्णालय, शिवनेरी अॅक्सिडेंट हॉस्पिटल येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले आह़े
उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सुर्वेगंध, नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र थोरात व पोलीस उपनिरीक्षक पद्मभूषण गायकवाड यांनी भेट दिली़  जखमींना एसटी महामंडळातर्फे प्रत्येकी 1 हजार आर्थिक, तर मृत ढोरे कुटुंबीयांना 1क् हजारांची मदत देण्यात आली आहे, अशी माहीती आगारप्रमुख रमेश हांडे व वाहतूक निरीक्षक महेश विटे 
यांनी दिली़ (वार्ताहर)
 
4एसटी बस ज्या वडाच्या झाडाला धडकली, त्या वडाच्या झाडावर असलेल्या आग्या मोहळाच्या माश्यांमुळे अपघात झाल्यानंतर बचाव कार्यात अडथळा येत होता. स्थानिक ग्रामस्थ दत्ता व:हाडी हे अपघाती रुग्णांना बाहेर काढत असताना त्यांना आग्या मोहळाच्या माश्यांनी चावा घेतल्याने उपचारांसाठी नारायणगाव येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आह़े  अपघातातील जखमींना एसटी बसमधून बाहेर काढण्यासाठी मृत्युंजय फाउंडेशनचे कार्यकर्ते आशिष हांडे, संजय वाजगे, अमोल रोकडे यांनी मदत केली़
4शिवसेनेच्या आशाताई बुचके, राष्ट्रवादीचे अमित बेनके, देवराम लांडे यांनी रूग्णांची विचारपूस केली. भाजपचे नेताजी डोके यांनी प्रत्येक रुग्णास 5 हजार रुपयांची उपचारांसाठी आर्थिक मदत दिली व मृताच्या कुटुंबाला 1क्  हजार रुपये मदत दिली. 
 

 

Web Title: Furious accidents in Junnar-Kurla ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.