रत्नागिरीत भरधाव मोटारीचा थरार; ७ वाहनांना धडक
By admin | Published: July 5, 2017 04:18 AM2017-07-05T04:18:17+5:302017-07-05T04:18:17+5:30
शहरातील बसस्थानकासमोर भरधाव वेगाने आलेल्या मोटारीने सुमारे सहा ते आठ किलोमीटरच्या अंतरात सहा दुचाकी व एका चारचाकीला
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शहरातील बसस्थानकासमोर भरधाव वेगाने आलेल्या मोटारीने सुमारे सहा ते आठ किलोमीटरच्या अंतरात सहा दुचाकी व एका चारचाकीला धडक देत एक महिला व एका छोट्या मुलासह पाचजणांना उडविले. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला. रात्री उशिरापर्यंत जिल्हा रूग्णालयाबाहेर प्रचंड गर्दी होती.
ऋषीकेश पाटणे हा वॅगनआर गाडी घेऊन कुवारबावकडून बसस्थानकाकडे येत होता. कुवारबावपासूनच तो भरधाव वेगाने गाडी चालवित होता. कुवारबाव येथेच त्याने एका दुचाकीला धडक दिली. त्यानंतर शहराच्या मारूती मंदिर भागापासूनच त्याने काहीजणांना धडक दिली. माळनाका येथे बाबू लल्लपा पवार यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे पवार जखमी झाले. त्यानंतर तेथे न थांबता त्याच वेगाने पाटणे याची गाडी बसस्थानकाच्या दिशेने निघाली.
बसस्थानक परिसरात ही गाडी दुभाजकावर आपटून उंच उडाली. या परिसरात तब्बल चार दुचाकी व एका सुमो गाडीला त्याने धडक दिली. प्रकाश अनंत शिंदे व ऋषीकेश रमेश नलावडे हे गंभीर जखमी झाले.