राज्यात स्वाइनचे आणखी १0 बळी
By Admin | Published: March 9, 2015 01:32 AM2015-03-09T01:32:52+5:302015-03-09T01:32:52+5:30
राज्यात स्वाइन फ्लूचा विळखा आणखी घट्ट होत चालला असून, शनिवारी आणखी १० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे १ जानेवारीपासून
पुणे : राज्यात स्वाइन फ्लूचा विळखा आणखी घट्ट होत चालला असून, शनिवारी आणखी १० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे १ जानेवारीपासून शनिवारपर्यंतचा मृतांचा आकडा २११ वर गेला आहे. त्यामध्ये नागपूर शहरात स्वाइन फ्लूने सर्वाधिक ४६ जणांचा बळी गेला आहे. तसेच शनिवारी स्वाइन फ्लूचे ११५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यात १ जानेवारीपासून शनिवारपर्यंत २ लाख ४१ हजार ३६८ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी २५ हजार १५० संशयित रुग्णांना औषध देण्यात आले आहे.
शनिवारी ११५ नवीन रुग्ण आढळले असून, राज्यातील एकूण रुग्णांची संख्या २५०१ वर गेली आहे. विविध जिल्ह्यांत ३९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ३७ जण व्हेंटिलेटरवर आहेत. शनिवारी १५३ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. मृतांमध्ये नागपुरातील ४६, पुणे शहर व ग्रामीण भागातील ३४, लातूरमधील १३, नाशिकमधील ११ रुग्णांचा समावेश आहे. राज्यातील इतर भागांतही स्वाइन फ्लूचा फैलाव झाला असून, रुग्णांची संख्या वाढत आहे. मृतांमध्ये २० जण परराज्यातील असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली. या बाबत रूग्णांमध्ये जागृती करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)