इथेनॉल हेच साखर कारखान्यांचे भविष्य
By admin | Published: March 27, 2016 01:13 AM2016-03-27T01:13:56+5:302016-03-27T01:13:56+5:30
सध्या साखर कारखानदारी तोट्यात असली तरी इथेनॉलला चांगला भाव आहे़ त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी इथेनॉल निर्मितीवर भर देऊन तोटा कमी करावा़
सोलापूर : सध्या साखर कारखानदारी तोट्यात असली तरी इथेनॉलला चांगला भाव आहे़ त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी इथेनॉल निर्मितीवर भर देऊन तोटा कमी करावा़ पेट्रोलमध्ये सध्या ५ टक्के इथेनॉल मिसळले जाते़ केवळ इथेनॉलवरही वाहने चालू शकतात. त्यामुळे कारखान्यांकडून तयार झालेले इथेनॉल केंद्र सरकार प्रति लिटर ४९ रुपये दराने विकत घेण्यास तयार आहे़ त्यामुळे इथेनॉल हेच भविष्य आहे, असा सल्ला केंद्रीय वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिला़
भारतीय राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने सोलापूर शहरातील दोन उड्डाणपुलासह २७ हजार कोटींच्या रस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन शनिवारी गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले़ त्यावेळी ते बोलत होते़
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्षस्थानी होते़ या कार्यक्रमास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार श्ािंदे, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा़ रावसाहेब दानवे, यांच्यासह जिल्ह्यातील आमदार,अधिकारी उपस्थित होते़