निवडणूक कामगिरीवर ठरणार मंत्र्यांचे भवितव्य

By admin | Published: February 20, 2017 04:40 AM2017-02-20T04:40:04+5:302017-02-20T04:40:04+5:30

महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत ज्या भाजपा मंत्र्यांच्या जिल्ह्यात पक्षाला चांगले यश मिळणार नाही त्यांना घरी जावे लागू

The future of the ministers will be on the performance of the election | निवडणूक कामगिरीवर ठरणार मंत्र्यांचे भवितव्य

निवडणूक कामगिरीवर ठरणार मंत्र्यांचे भवितव्य

Next

यदु जोशी / मुंबई
महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत ज्या भाजपा मंत्र्यांच्या जिल्ह्यात पक्षाला चांगले यश मिळणार नाही त्यांना घरी जावे लागू शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आज या बाबतचे सूतोवाच केले. वर्षा निवासस्थानी ते निवडक पत्रकारांशी बोलत होते.
भाजपाचे मंत्री आणि आमदारांच्या या निवडणुकीतील कामगिरीचे मूल्यांकन मी निकालानंतर निश्चितपणे करणार आहे. ज्यांची कामगिरी अत्यंत असमाधानकारक असेल त्यांना घरी जावे लागू शकते. काहींना कामगिरी सुधारण्यास सांगितले जाईल. जे मंत्री आपल्या जिल्ह्याचे नेते होऊ शकत नाहीत ते राज्याचे नेते कसे होऊ शकतात, या शब्दात मुख्यमंत्र्यांनी संभाव्य कारवाईचे संकेत दिले. तसेच, ज्या राज्यमंत्र्यांची कामगिरी चांगली असेल, त्यांना बढती मिळू शकते, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. काही ठिकाणी भाजपाची परिस्थिती आधीच्या निवणुकीत अजिबातच चांगली नव्हती. तेथे चांगली कामगिरी म्हणजे अगदी सत्ताच मिळाली असे नाही पण निदान भाजपासाठी आजवर प्रतिकूल असलेल्या जिल्ह्यांमध्ये कामगिरी सुधारल्याचे दिसलेच पाहिजे. निवडणुकीनंतर महामंडळांवरील नियुक्त्या करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.
मराठा समाजाच्या मोर्चांबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच लक्ष्य केले आहे. या बाबत मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांचे आरोप नैराश्येतून केलेले आहेत. टीका करायला काही उरले नाही म्हणजे असे आरोप होतात. अनेक नेत्यांची अशी अपेक्षा होती की मराठा समाजाच्या मोर्चांची सूत्रे त्यांच्या हाती यावीत. यासाठी त्यांनी चळवळीमध्ये त्यांची माणसेही सोडली. पण काहीही हाती न आल्याने नैराश्यापोटी माझ्यावर आरोप केले जात आहेत.

सूत्रे त्यांच्या हाती यावीत. यासाठी त्यांनी चळवळीमध्ये त्यांची काही माणसेही सोडली होती पण काहीही हाती न आल्याने त्यांच्या पदरी नैराश्य आले आणि त्यातून माझ्यावर आरोप केले जात आहेत.
पालिका निवडणुकीनंतर मुंबईत भाजपाला कोणाशी युती करण्याची गरजच पडली तर ती फक्त आणि फक्त पारदर्शक कारभाराची अट मान्य असलेल्यांबरोबरच होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ठाकरेमुक्त, पवारमुक्तचे
लक्ष्य कधीच नाही
महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीनंतर ठाकरेमुक्त मुंबई आणि पवारमुक्त महाराष्ट्र असे चित्र दिसेल का या प्रश्नात मुख्यमंत्री म्हणाले की ते आमचे कुणाचेही लक्ष्य नाही. असे ठाकरेमुक्त, पवारमुक्त करणे शक्यदेखील नसते.
कुठला पक्ष असा संपत नसतो आणि तो कुणाचा उद्देशही असता कामा नये. पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्या ‘काँग्रेसमुक्त भारत’ या विचारामागे काँग्रेसच्या जनहितविरोधी नीतींपासून मुक्ती हा होता. मुंबईत आमचा विरोध सेनेच्या आचाराला आहे.

Web Title: The future of the ministers will be on the performance of the election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.