मनसेच्या दीपोत्सवामुळे काही राजकीय पक्षांचे भवितव्य अंधारात; या नेत्याच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 01:23 PM2022-10-22T13:23:11+5:302022-10-22T13:24:45+5:30

काल शिवाजी पार्क येथे मनसेकडून दिवाळीनिमित्त दीपोत्सवाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात मनसे प्रमुख राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.

Future of some political parties in darkness due to MNS Deepotsav mns leader shalini thackeray tweet | मनसेच्या दीपोत्सवामुळे काही राजकीय पक्षांचे भवितव्य अंधारात; या नेत्याच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण

मनसेच्या दीपोत्सवामुळे काही राजकीय पक्षांचे भवितव्य अंधारात; या नेत्याच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण

Next

मुंबई - काल शिवाजी पार्क येथे मनसेकडून दिवाळीनिमित्त दीपोत्सवाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात मनसे प्रमुख राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमिवर आता मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी एक सूचक ट्विट केले आहे.

"मनसेच्या शिवाजी पार्कमधील दिपोस्तव कार्यक्रमामुळे मात्र आगामी काळात काही राजकीय पक्षांचे भवितव्य अंधारात जाणार, हे मात्र नक्की आहे.....!!!!! अभी तो सिर्फ ये झांकी है,पिक्चर अभी बाकी है....!!!", असं ट्विट मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी केले आहे. या ट्विटमुळे सध्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 

राज ठाकरेंचा नातवावरुन पंच, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री गालात हसले

मनसेप्रमुख राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी गेले काही दिवस जवळीक वाढलेली असतानाच राज यांच्या वतीने शिवाजी पार्कवर आयोजित दीपोत्सवाला शुक्रवारी दोन्ही नेत्यांनी हजेरी लावली. या सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरेंनी मिश्कील टिपण्णी केल्याचं दिसून आलं. राज ठाकरेंनी नातवाल धरुन एक पंच मारला. दीपोत्सव सोहळ्यातील सजावट आणि कार्यक्रमाची वाढती रुपरेषा पाहून एकाने प्रश्न विचारला, असे म्हणत राज ठाकरेंनी मिश्कील उत्तर दिले. त्यावेळी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही हसायला लागले.  

Raj Thackeray: राज ठाकरेंचा नातवावरुन पंच, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री गालात हसले

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप- शिंदे सेना व मनसे अशी युती होणार असल्याची चर्चा आहे. त्यातच राज ठाकरे यांनी केलेल्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देण्याची भूमिका शिंदे, फडणवीस यांनी घेतल्याचे अलीकडे दिसत आहे. मात्र, या कार्यक्रमाचा कोणाताही राजकीय अर्थ काढण्याची गरज नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. दीपोत्सवाच्या कार्यक्रमानंतर एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, या सोहळ्यातील तीन दिग्गज नेत्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यासोबतच, राज ठाकरे यांच्या हातात दिसलेला त्यांच्या नातवाचीही आता चर्चा होत आहे. कदाचित, त्यामुळेच राज ठाकरेंनी नातवाला धरुन पंच मारला. 

Web Title: Future of some political parties in darkness due to MNS Deepotsav mns leader shalini thackeray tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.