ओला-उबेरचे भवितव्य ‘आॅनलाईन’ ठरवणार

By Admin | Published: August 27, 2016 04:44 AM2016-08-27T04:44:59+5:302016-08-27T04:44:59+5:30

सध्या सुरु असलेल्या ओला-उबेर विरुद्ध काळी-पिवळी टॅक्सी यांच्यामधील वाद सोडवण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायत आॅनलाईन सर्व्हे करणार आहे.

The future of Ola-Uber will be 'online' | ओला-उबेरचे भवितव्य ‘आॅनलाईन’ ठरवणार

ओला-उबेरचे भवितव्य ‘आॅनलाईन’ ठरवणार

googlenewsNext


मुंबई : सध्या सुरु असलेल्या ओला-उबेर विरुद्ध काळी-पिवळी टॅक्सी यांच्यामधील वाद सोडवण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायत आॅनलाईन सर्व्हे करणार आहे. त्यासाठी मुंबई ग्राहक पंचायत खास प्रश्नावली करणार असून यात प्रवाशांची सुरक्षितता ते प्रवासातील समाधान या सर्व प्रश्नांची उत्तरे आॅनलाईन जाणून घेण्यात येणार आहे.
एका क्लिकवर प्रवाशांना आरामदायक प्रवाससेवा पुरवणारी ओला-उबेरला प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शविली. ओला-उबेरचालक कधीही भाडे नाकारत नसल्याने सामान्य प्रवासी काळ््या-पिवळ््या टॅक्सीपेक्षा ओला-उबेरकडे मोठ्या संख्येने वळत आहे. ओला-उबेरच्या तुलनेत काळी-पिवळी टॅक्सी किती सुरक्षित आहे हे जाणून घेण्यासाठी ग्राहक पंचायत आॅनलाईन सर्व्हे करणार आहे. ओला-उबेर विरुद्ध काळी-पिवळी टॅक्सी यांच्या वादात सर्वसामान्य प्रवासी वेठीस धरले जात आहे. यामुळे ग्राहक पंचायतीने या वादावर ‘आॅनलाईन’ तोडगा काढला आहे. या नुसार मुंबई ग्राहक पंचायत डॉट ओआरजी (६६६. े४ेुं्रॅ१ंँं‘स्रंल्लूँं८ं३.ङ्म१ॅ) या संकेत स्थळावर प्रवाशांना आपले मत नोंदवती येणे शक्य आहे. या प्रश्नावलीत प्रवासीहिताची उत्तरे देता येतील. (प्रतिनिधी)
निकाल ही आॅनलाईन
मुंबईकरांना ओला-उबेर विरुद्ध काळी-पिवळी टॅक्सी यांच्या वादाचा फटका बसू नये, यासाठी आॅनलाईन सर्व्हे घेतला जाणार आहे. हा सर्व्हे ३१ आॅगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. २ सप्टेंबर रोजी या सर्व्हेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मुळात प्रवाशांना प्रवास करण्यासाठी सोयीचे वाहन नक्की कोणते याचा वेध घेण्यासाठी ग्राहक पंचायतीने हा सर्व्हे घेण्याचे ठरवले असल्याची माहिती मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. शिरीष देशपांडे यांनी दिली.

Web Title: The future of Ola-Uber will be 'online'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.