जि.प.शाळेचे भवितव्य धोक्यात
By admin | Published: August 26, 2016 02:28 AM2016-08-26T02:28:07+5:302016-08-26T02:28:07+5:30
तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गळती थांबण्याचे नाव घेत नसून पटसंख्या दिवसेंदिवस घटत आहे.
अमोल जंगम,
म्हसळा- तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गळती थांबण्याचे नाव घेत नसून पटसंख्या दिवसेंदिवस घटत आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये पोषण आहार, मोफत पाठ्यपुस्तके दिली जात आहेत. शाळांना इमारत, क्रीडांगण आदी मूलभूत सुविधाही चांगल्या आहेत. शैक्षणिक शुल्कही नाही, तरीही जिल्हा परिषद शाळांकडे विद्यार्थी पाठ का फिरवत आहेत, याचा शिक्षकांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. खासगी शाळांमध्ये पोषण आहार नाही आणि मोफत पाठ्यपुस्तकेही नाहीत, मूलभूत सुविधांचीही वानवा आहे. तेथील शिक्षकही तुटपुंज्या वेतनावर राबतात, तरीही खासगी शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढतच आहे.
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ५० शाळांमध्ये वीसपेक्षा कमी विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्येला घरघर लागल्याने तालुक्यात एकवीस शिक्षक अतिरिक्त असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
म्हसळा तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेच्या ११० शाळांमधून २८५ शिक्षक व ३८५९ विद्यार्थी आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागातील पन्नास शाळांमध्ये पटसंख्या कमी आहे.
२१ ते३० पटसंख्या असलेल्या १४ शाळांमध्ये सितपाचा कोंड, म्हसळे आ. वाडी, खरसई उर्दू, बागाची बाडी, बनोटी, मेंदडी उर्दू, काळसुरी, जांभूळ, घूम, कोळे, खामगांव, पाणदरे, पंगळोली, कुडगांव कोंड या शाळांमधील ३५१ विद्यार्थ्यांसाठी २७ शिक्षक आहेत. ३१ ते ६० पटसंख्या असलेल्या २३ शाळांमधील ९४२ विद्यार्थ्यांसाठी ५१ शिक्षक, ६१ ते १०० पटसंख्या असलेल्या १४ शाळांमधील १०२५ विद्यार्थ्यांसाठी ४८ शिक्षक तर तालुक्यातील सर्वात जास्त पटसंख्या असलेल्या ७ शाळांमधील १०२३ विद्यार्थ्यांसाठी ४३ शिक्षक आहेत. याचा अर्थ असा की, तालुक्यातील वीस व त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या बावन्न शाळांमध्ये पाच विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक आहे, २१ ते ३० पटसंख्या असलेल्या १४ शाळांमध्ये १३ विद्यार्थ्यांमागे एकशिक्षक आहे.
३१ ते ६० पटसंख्या असलेल्या २३ शाळांमध्ये १७ विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक आहे . ६१ ते १०० पटसंख्या असलेल्या १४ शाळांमध्ये २२ विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक तर १०० ते १८० पटसंख्या असलेल्या ७ शाळांमध्ये २४ विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक असे प्रमाण येत आहे. दोन पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये दोन शिक्षक तर सर्वात जास्त १८१ पटसंख्या असलेल्या खरसई शाळेमध्ये केवळ सहा शिक्षक आहेत.म्हणजे तालुक्यात अनेक शाळांवर विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे; पण तेथे शिक्षक कमी आहेत, तर दुसरीकडे अनेक शाळा अशाही आहेत की तिथे विद्यार्थ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. त्या शाळांमध्ये मात्र शिक्षक जास्तीचे आहेत. जिथे शिक्षकांची गरज आहे अशा शाळांमध्ये शिक्षकांना शिक्षणाधिकारी का पाठवीत नाहीत हा संशोधनाचा विषय आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाचा भविष्यात मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
>६ ते १० पटसंख्या असलेल्या १६ शाळा
दुर्गवाडी (विद्यार्थी ६ ,शिक्षक २ ), चिराठी (विद्यार्थी २, शिक्षक ७ ) , चंदनवाडी ( विद्यार्थी २,शिक्षक ६ ), ताम्हाणे करंबे (विद्यार्थी २,शिक्षक ७), बागेचीवाडी ( विद्यार्थी २ ,शिक्षक ७ ), घाणेरी कोंड ( विद्यार्थी २, शिक्षक १०), चाफेवाडी (विद्यार्थी २, शिक्षक ९ ) , सोनघर ( विद्यार्थी २ ,शिक्षक ७ ), लेप गौळवाडी (विद्यार्थी ९ ,शिक्षक २ ) , खामगांव उर्दू ( विद्यार्थी २ ,शिक्षक ८ ) , वावे मराठी ( विद्यार्थी२ ,शिक्षक ६) , गडदाव कोंड ( विद्यार्थी २ ,शिक्षक ६) , फळसप ( विद्यार्थी २ ,शिक्षक ६ ) , आंबेत मराठी ( विद्यार्थी २ ,शिक्षक ६) , रातविणे ( विद्यार्थी २, शिक्षक ८ ) , आंबेत बौद्धवाडी (विद्यार्थी २ ,शिक्षक १०)
>११ ते २० पटसंख्या असलेल्या २० शाळा
सुरई (विद्यार्थी १८, शिक्षक २ ), आगरवाडा (विद्यार्थी १९, शिक्षक २ ), गोंडघर (विद्यार्थी १६, शिक्षक २ ), नेवरूळ (विद्यार्थी १८, शिक्षक २ ), रु द्रवट ( विद्यार्थी ११,शिक्षक २), आडी म.खाडी (विद्यार्थी २०,शिक्षक २ ), आडी बंदर उर्दू (विद्यार्थी १३,शिक्षक २), घोणसे (विद्यार्थी १३, शिक्षक २ ), कुडतुडी गौळवाडी (विद्यार्थी १३,शिक्षक २ ), गायरोणे (विद्यार्थी १९, शिक्षक २ ), बेटकर वाडी (विद्यार्थी १३, शिक्षक २), विठ्ठलवाडी (विद्यार्थी २ ,शिक्षक ११), दगडघुम(विद्यार्थी २ ,शिक्षक १२), आंबेत कोंड ( विद्यार्थी २,शिक्षक १९), देहेन (विद्यार्थी २, शिक्षक १४), सांगवड (विद्यार्थी २, शिक्षक १८), भापट (विद्यार्थी २ ,शिक्षक १९), ढोरजे (विद्यार्थी २, शिक्षक २०), कोकबल (विद्यार्थी २, शिक्षक १६), ताडाचा कोंड (विद्यार्थी २ , शिक्षक १८)
>१ ते ५ पटसंख्या असलेल्या शाळा
सावर ( विद्यार्थी ३ ,शिक्षक २ ) , तळवडे ( विद्यार्थी ४ ,शिक्षक २ ), कोंझरी ( विद्यार्थी २ ,शिक्षक २ ), कोंझरी कोंड (विद्यार्थी ५, शिक्षक २ ), आडी बंदर मराठी ( विद्यार्थी ३, शिक्षक २), कानसेवाडी (विद्यार्थी २, शिक्षक ४ ), सरवर ( विद्यार्थी ५, शिक्षक २), देवघर (विद्यार्थी ३ ,शिक्षक २) , खामगांव (विद्यार्थी २, शिक्षक ५) , नवदर (विद्यार्थी २, शिक्षक २), ताम्हाणे शिर्के (विद्यार्थी २, शिक्षक २) , कळकीचा कोंड (विद्यार्थी ३, शिक्षक २ ) , कासार मलई ( विद्यार्थी २, शिक्षक २ ), आंबेत नाविवाडी ( विद्यार्थी २, शिक्षक २ ), मठाचीवाडी (विद्यार्थी २, शिक्षक २ ), देहेन नर्सरी ( विद्यार्थी ५, शिक्षक २ )