जी-नॉर्थ वॉर्ड - मनसेच्या इंजिनाला धनुष्यबाणाचे कडवे आव्हान

By admin | Published: December 29, 2016 12:36 PM2016-12-29T12:36:06+5:302016-12-29T14:52:31+5:30

ज्या दादरमधून शिवसेनेने मराठीच्या राजकारणाला सुरुवात केली तिथेच मनसेचे पाच नगरसेवक निवडून आले. यंदा मनसे आपल्या जागा राखणार की शिवसेना पराभवाची परतफेड करणार,

G-North Ward - A tough challenge for the arc of the MNS engine | जी-नॉर्थ वॉर्ड - मनसेच्या इंजिनाला धनुष्यबाणाचे कडवे आव्हान

जी-नॉर्थ वॉर्ड - मनसेच्या इंजिनाला धनुष्यबाणाचे कडवे आव्हान

Next
>- गौरीशंकर घाळे
मुंबई : दादर, माहिम आणि धारावीचा समावेश असणा-या जी-नॉर्थ वॉर्डातील निवडणुक दंगल यंदा विशेष लक्षवेधी असणार आहे. ज्या दादरमधून शिवसेनेने मराठीच्या राजकारणाला सुरुवात केली तिथेच मनसेचे पाच नगरसेवक निवडून आले. यंदा मनसे आपल्या जागा राखणार की शिवसेना पराभवाची परतफेड करणार, याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
मनसेच्या मराठी झंझावाताने २०१२च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला अनेक ठिकाणी मार दिला होता. त्यातील जिव्हारी लागलेली जखम ठरली जी-नॉर्थमधील पराभव. शिवसेना भवन, शिवाजी पार्क ज्या परिसरात आहे तेथूनच शिवसेनेला हद्दपार व्हावे लागल्याची सल ‘मातोश्री’ला दिर्घकाळ सलत राहीली. एकीकडे मनसेचा झंझावात तर दुसरीकडे स्थानिक राजकारणामुळे काँग्रेसवासी झालेले सदा सरवणकर याची जबर किंमत शिवसेनेला मोजावी लागली होती. २०१२च्या निवडणुकीनंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. सदा सरवणकर स्वगृही अर्थात शिवसेनेत परतले. तर गेल्यावेळी लाटेवर स्वार झालेल्या मनससमोर स्वत:चे अस्तित्व टिकविण्याचे मोठे आव्हान आहे. 
गेल्या पाच वर्षात शिवसेनेने जाणीवपूर्वक या भागातील पक्षसंघटना मजबूत केली. दूरावलेल्या शिवसैनिकांना जवळ करण्याच्या मोहिमेने येथील शाखा पुन्हा गजबजून गेल्याचे चित्र आहे. त्याच जोरावर यंदा पुन्हा भगवा फडकविण्याचा शिवसेनेचा मनसुबा आहे. 
मनसेच्या इंजिनासमोर अनेक अडचणी आहेत. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदा राज ठाकरे आणि पर्यायाने मनसेची लाट नाही. त्यातच मतदारसंघ पुर्नरचना आणि आरक्षणाचा सर्वाधिक फटका मनसे नगरसेवकांना बसला आहे. संदीप देशपांडेंसारख्या दिग्गज उमेदवारांना दुसरा मतदारसंघ शोधावा लागत आहे. प्रभाग आरक्षित झाला, पाच वर्ष जपलेला भाग,मतदार शेजारच्या प्रभागात गेला अशा अनेक अडचणी मनसेसमोर आहेत. त्यातच येथील ११ पैकी ७ प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्याने मनसेच्या पाचपैकी चार नगरसेवकांची अडचण झाली आहे. 
तर धारावी, माहिम भागात मात्र शिवसेना-मनसे अशी विभागणी नसेल. येथील मिश्र वस्ती आणि बहुरंगी लढत यंदाही कायम राहील. काँग्रेस, आरपीआय, समाजवादीसह एक अपक्ष येथून विजयी ठरले होते. समाजवादीसमोर यंदा एमआयएमचे आव्हान असणार आहे. पक्षिय राजकारणापेक्षा स्थानिक घटकच येथे निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. 
 
जी नॉर्थ 
१८२ खुला,
१८३ इतर मागासवर्ग महिला,
१८४ खुला,
१८५ खुला,
१८६ इतर मागासवर्ग,
१८७ खुला महिला,
१८८ खुला महिला,
१८९ खुला महिला,
१९० इतर मागासवर्ग महिला,
१९१ खुला महिला, 
१९२ खुला महिला 
 
प्रभाग क्रमांक १८२
आरक्षण - खुला 
एकूण लोकसंख्या - ५२३९६
अनुसूचित जाती - ११२७
अनुसूचित जमाती - ५७४
प्रभागाची व्याप्ती - माहिम कोळीवाडा, बाबासाहेब आंबेडकर नगर, मकरंद सोसायटी
 
प्रभाग क्रमांक १८३
आरक्षण - इतर मागासवर्ग महिला
एकूण लोकसंख्या - ४९०५०
अनुसूचित जाती - ८८०६
अनुसूचित जमाती - ५२४
प्रभागाची व्याप्ती - नेचर पार्क, धारावी आगार, नाईक नगर.
 
प्रभाग क्रमांक १८४
आरक्षण - खुला
एकूण लोकसंख्या - ५१८०७
अनुसूचित जाती - ५२९२
अनुसूचित जमाती - २०५
प्रभागाची व्याप्ती - लक्ष्मीबाग, इंदिरा नगर, राजीव गांधी नगर, श्रमिक विद्यापीठ
 
प्रभाग क्रमांक - १८५
आरक्षण - खुला
एकूण लोकसंख्या - ५०३५८
अनुसूचित जाती - १९०३
अनुसूचित जमाती - १२५
प्रभागाची व्याप्ती - एस्ट्रेला कंपनी, राजीव गांधी नगर
 
प्रभाग क्रमांक - १८६ 
आरक्षण - इतर मागासर्ग
एकूण लोकसंख्या - ५३४४७
अनुसूचित जाती - १४७६९
अनुसूचित जमाती - ४८८
प्रभागाची व्याप्ती - मुकूंद नगर(पूर्व), धारावी गांव(पूर्व)
 
प्रभाग क्रमांक - १८७
आरक्षण - खुला महिला
एकूण लोकसंख्या - ४९९४२
अनुसूचित जाती - ३०६३
अनुसूचित जमाती - ३९७
प्रभागाची व्याप्ती - धारावी गांव, नवरंग कंपाऊंड, शम्मी नगर.
 
प्रभाग क्रमांक - १८८
आरक्षण - खुला महिला
एकूण लोकसंख्या - ६११३६
अनुसूचित जाती - ६१२३
अनुसूचित जमाती - ४३२
प्रभागाची व्याप्ती - शेठ वाडी, आर.पी.नगर,भाटीया नगर.
 
प्रभाग क्रमांक - १८९
आरक्षण - खुला महिला
एकूण लोकसंख्या - ५१०७६
अनुसूचित जाती - ९१३६
अनुसूचित जमाती - ४६७
प्रभागाची व्याप्ती - शाहु नगर, हनुमान नगर, लेबर कॅम्प
 
प्रभाग क्रमांक - १९० 
आरक्षण - इतर मागासवर्ग महिला
एकूण लोकसंख्या - ५४६३९
अनुसूचित जाती - १२९७
अनुसूचित जमाती - १८०
प्रभागाची व्याप्ती - नवजीवन कॉलनी, वांजा वाडी, गीता नगर, व्हिएसएनल कॉलनी.
 
प्रभाग क्रमांक १९१
आरक्षण - खुला महिला
एकूण लोकसंख्या - ५६६७६
अनुसूचित जाती - २०१५
अनुसूचित जमाती - ९४
प्रभागाची व्याप्ती - सिद्धीविनायक मंदिर, महालक्ष्मी सिंधी कॉलनी, शिवाजी पार्क.
 
प्रभाग क्रमांक - १९२
आरक्षण - खुला महिला
एकूण लोकसंख्या - ५२९१९
अनुसूचित जाती - ३८४०
अनुसूचित जमाती - १७८
प्रभागाची व्याप्ती - दादर पश्चिम, बाबासाहेब आंबेडकर नगर, कामगार क्रिडा केंद्र
 
२०१२च्या निवडणुकीतील विजयी आणि पराभूत उमेदवार
प्रभागविजयी उमेदवारप्राप्त मते पराभूत उमेदवार प्राप्त मते
१७५ बोरा सुब्बरेड्डी, आरपीआय ३४३०महेंद्र शिंदे, काँग्रेस ३२०६
१७६ अनुषा कदम, शिवसेना ८९३७ गंगा माने, काँग्रेस ८१४८
१७७ राजेंद्र सुर्यवंशी, शिवसेना ७६७६ दिपक काले, काँग्रेस ६६७९
१७८ वकील शेख, कॉंग्रेस ९३१४ भूपेंद्र महाले , शिवसेना ९२४६ 
१७९ ज्योत्सा परमार, समाजवादी ८०२८ सुमन कादर, काँग्रेस ५९८४ 
१८० विष्णू गायकवाड, अपक्ष ४४५३ प्रकाश दोंडे, काँग्रेस ३०५४
१८१ श्रद्धा पाटील, मनसे ७५५४ जयश्री तारे, शिवसेना ६१८६ 
१८२ विरेंद्र तांडेल, मनसे ५०८८ समाधान सरवणकर, कॉंग्रेस ४८८१ 
१८३ मनिष चव्हाण, मनसे १२६७६ मिलिंद वैद्य, ८७६५ 
१८४ सुधीर जाधव, मनसे ९३५२ यशवंत विचारे, शिवसेना ६६४५ 
१८५ संदीप देशपांडे, मनसे १३४५३ प्रविण शेट्टे ७१९०

Web Title: G-North Ward - A tough challenge for the arc of the MNS engine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.