खाकीने निभावले रक्तापलीकडचे नाते...; पुरामुळे रस्ता बंद, प्रसूती झालेल्या मातेसाठी दिले हेलिकॉप्टर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 06:08 AM2024-09-12T06:08:11+5:302024-09-12T06:08:37+5:30

८ सप्टेंबरला तिला प्रसववेदना जाणवू लागल्या. मात्र, याच वेळी अतिवृष्टीमुळे सर्वत्र पाणीच पाणी होऊन भामरागडचा संपर्क तुटला होता.

Gadchiroli police provided a helicopter to help the mother who gave birth | खाकीने निभावले रक्तापलीकडचे नाते...; पुरामुळे रस्ता बंद, प्रसूती झालेल्या मातेसाठी दिले हेलिकॉप्टर

खाकीने निभावले रक्तापलीकडचे नाते...; पुरामुळे रस्ता बंद, प्रसूती झालेल्या मातेसाठी दिले हेलिकॉप्टर

गडचिरोली - अतिवृष्टीमुळे तीन दिवसांपासून अतिदुर्गम, नक्षलप्रभावित व आदिवासीबहुल भामरागडचा संपर्क तुटला आहे. ८ सप्टेंबरला पुरातून वाट काढत एका महिलेची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रसूती केली होती. मात्र, या मातेची उपचारादरम्यान प्रकृती खालावली.

पुरामुळे सगळ्या वाटा अडलेल्या होत्या. अशा स्थितीत ११ सप्टेंबरला पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सकाळी हेलिकॉप्टरने रक्ताची पिशवी पोहोचवण्यात आली. पूरसंकटात आरोग्य विभागाची तत्परता व 'खाकी' वर्दीने दाखविलेल्या माणुसकीची सध्या सर्वत्र चर्चा आहे. मंतोशी गजेंद्र चौधरी (२४, रा. आरेवाडा, ता. भामरागड) असे महिलेचे नाव आहे. ८ सप्टेंबरला तिला प्रसववेदना जाणवू लागल्या. मात्र, याच वेळी अतिवृष्टीमुळे सर्वत्र पाणीच पाणी होऊन भामरागडचा संपर्क तुटला होता.

अखेर रक्ताची पिशवी घेऊन कर्मचारी निघाले

आरोग्य यंत्रणेने तत्परता दाखवत पुरातून वाट काढून तिला दवाखान्यात आणले. आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी यासाठी डॉक्टरांना मदत केली. ९ सप्टेंबर रोजी मंतोशीची सुरक्षित प्रसूती झाली. रक्तस्त्राव झाल्याने तिला एक पिशवी रक्त चढविले. १० सप्टेंबर रोजी तिला आणखी एका रक्त पिशवीची गरज होती. मात्र रुग्णालयात रक्त उपलब्ध नव्हते. भामरागड ते गडचिरोली १६५ किमी अंतर आहे. ११ सप्टेंबर रोजी गडचिरोलीतून एक पिशवी रक्त घेऊन आरोग्य कर्मचारी रवाना झाले, यासाठी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले.

रक्तपेढीत रक्ताची एकच पिशवी उपलब्ध

दरम्यान, मंतोशी चौधरीचा रक्तगट B-ve असून तो दुर्मीळ आहे. जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीतही एकमेव पिशवी उपलब्ध होती. ती हेलिकॉप्टरने पोहोचविण्यात आली. आरोग्य व पोलिस विभागाच्या समन्वयामुळे अतिदुर्गम भागात तत्परतेने वैद्यकीय सुविधा पुरविण्यात यश आले व मंतोशी चौधरीवरील धोका टळला आहे.

Web Title: Gadchiroli police provided a helicopter to help the mother who gave birth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.