गडचिरोलीही येणार औद्योगिक नकाशावर

By admin | Published: May 12, 2017 03:08 AM2017-05-12T03:08:33+5:302017-05-12T03:08:33+5:30

नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीत प्रथमच एक मोठा उद्योग सुरू होत आहे.

Gadchiroli will come on an industrial map | गडचिरोलीही येणार औद्योगिक नकाशावर

गडचिरोलीही येणार औद्योगिक नकाशावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीत प्रथमच एक मोठा उद्योग सुरू होत आहे.
चामोर्शी तालुक्यातील कोनसरी गावालगत लॉयड मेटल्स कंपनीच्या लोह प्रकल्पाचे भूमीपूजन शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
एकूण ७०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या ४ हजारांवर लोकांना रोजगार मिळणार असल्याची माहिती गुरुवारी खासदार अशोक नेते यांनी पत्रपरिषदेत दिली.गेल्या दोन वर्षांत हा प्रकल्प प्रत्यक्षात सुरू करण्यासाठीआवश्यक ती प्रक्रिया मार्गी लावण्यात आली. ५७ हेक्टर जागेत उभारला जाणारा हा प्रकल्प येत्या ४ वर्षात पूर्ण केला जाणार आहे. त्यामुळे गडचिरोलीसारखा जिल्हा प्रथमच औद्योगिक नकाशावर येणार आहे. पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी गुरुवारी या भागाला भेट देऊन येथील सुरक्षाव्यवस्थेची पहाणी केली.

Web Title: Gadchiroli will come on an industrial map

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.